मंगळवार, ५ जुलै २०२२.

आषाढ शुक्ल षष्ठी. ग्रीष्म ऋतू. दक्षिणायन. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज दुपारी १२ नंतर चांगला दिवस आहे.” घबाड सकाळी १०.३० पर्यंत आहे. आज ‘व्यतिपात’ योग दुपारी १२.१५ पर्यंत आहे, त्यानंतर ‘वरिया’ योग आहे.

चंद्र नक्षत्र: पूर्वा फाल्गुन

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) हातून उत्तम लेखन होईल. प्रवास कार्यसाधक होतील. अधिकारात वाढ होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. वाहन जपून चालवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) येणी वसूल होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) खर्च वाढतील. प्रेमात यश मिळेल. कमी बोलणे हिताचे आहे.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) काय मार्गि लागतील. कामाचे कौतुक होईल. बौद्धिक क्षमता कामी येईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे नकोत. दिवसाची सुरुवात संथ होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी वजन वाढेल. सन्मान मिळतील. उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रवास कार्यसाधक होतील. जोडीदाराशी वाद विवाद नकोत. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाचा पूर्वार्ध काहीसा संथ आहे. संध्याकाळ नंतर अनुकूलता वाढेल. जोडीदाराशी बौद्धिक चर्चा होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. दगदग वाढेल. संध्याकाळ आनंदाची.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) भागीदारी व्यवसायात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. संतती कडून आनंदाची बातमी मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. कामाचा वेग वाढेल. धावपळ होईल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago