मंगळवार, २ ऑगस्ट २०२2

. श्रावण, शुक्ल पंचमी. दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.

चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना

“आज चांगला दिवस, *नागपंचमी, श्रावणी* आहे” मंगळागौरी पूजन करावे. आज ‘शिव’ योग आहे

रविचा चंद्राशी आणि शुक्राचा हर्षलशी लाभ योग् होतआहे.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक आवक वाढेल. प्रतिष्ठा मिळेल. कामे मार्गी लागतील. अहंकार मात्र टाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संतती संबंधित चिंता निर्माण होऊ शकते. छोटे प्रवास घडतील. शत्रू पराभूत होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) घरात शांतता ठेवा. विनाकारण वादविवाद नकोत. संयम पाळा. आरोग्य सांभाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वृद्धी होईल. नवीन कल्पना सुचतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. व्यवसायिक उलाढाल वाढेल. लाभदायक कालावधी आहे.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चातुर्य दाखवाल. स्वतःवर खुश राहाल. मनासारखी कामे होतील. आरोग्यदायी वाटेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. चुकीचे निर्णय होऊ शकतात. महत्वाचे करार आज नकोत.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायिक चातुर्य वापराल. प्रगतीचा दिवस आहे. सौख्य लाभेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) शुभ ग्रह आनंदाचा वर्षाव करतील. दबदबा वाढेल. मन प्रसन्न राहील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. राजकीय पटलावर तुमचा उदय होईल. सरकारी कामातून लाभ होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज महत्वाची कामे नकोत. विश्र्नाती घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. वरिष्ठ किंवा सरकारी कामातून त्रास संभवतो.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभदायक दिवस आहे. भिन्न लिंगी व्यक्तींकडून फायदा होईल. जोडीदारास समजून घ्या. कर्जे घेऊ नका.

 

२ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर चंद्र आणि रवी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या उच्च प्रतीचे आहात. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या मध्ये जबरदस्त कल्पनाशक्ती आहे. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याची तुम्ही प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे रूपांतर करू शकतात. तुम्ही विचारी आहात आणि निस्वार्थी तसेच विचारवंत देखील आहात. इतरांच्या भावनांचे तुम्ही कदर करतात. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. कोणत्याही कामाचे तुम्ही उद्दिष्ट विसरत नाहीत. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला समाजापासून एकटे राहणे आणि स्वप्नात रंगणे आवडते. तुमच्यावर प्रतिष्ठा, कल्पकता आणि अधिकार असतो. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. कोणत्याही व्यवसाय मध्ये तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. तुम्हाला थिएटर्स, सहली, प्रवास, सिनेमा, भ्रमंती यांची आवड असते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब असतो. तुम्ही लोकांना आकर्षित करून घेऊ शकतात.

व्यवसाय:- संगीतकार, कथालेखक, कादंबरी लिखाण, पेंटिंग्स, कविता, नाट्यकृती लिहिणे, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, केमिस्ट, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, दंतवैद्य, सर्जरी.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, बिस्किटी.

शुभ रत्न:- मोती आणि हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

 

Devyani Sonar

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

11 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

19 hours ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago