• सोमवार, ९ मे २०२२. वैशाख शुक्ल अष्टमी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

“आज चांगला दिवस *दुर्गाष्टमी* आहे.”

चंद्रनक्षत्र – आश्लेषा (संध्याकाळी ५.०८ पर्यंत) आज वृद्धी योग रात्री ८.४२ पर्यंत आहे. नंतर ध्रुव योगआहे.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महत्वाची कामे आज सकाळी पूर्ण करा. शेतीची कामे मार्गी लागतील. संध्याकाळ काहीशी चिंतेची असू शकते.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. शत्रूच्या कारवाया वाढतील. कामाच्या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. जेष्ठ नागरिकांशी वाद होऊ शकतात. घरात काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्म विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. कुटुंबाची चिंता वाटेल. आरोग्य सांभाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. धावपळ होईल. आज महत्वाची कामे नकोत. जोडीदाराशी वाद संभवतात.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज सकाळी पूर्ण करून घ्या. संध्याकाळ विश्रांतीची.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तरार्ध अधिक लाभाचा आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. उत्तम संवाद होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भाटीगाठी होतील. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक वाढत जाईल. उत्तरार्ध अनुकूल आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. उत्तरार्धात मात्र कामे मार्गी लागतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) महत्वाची कामे दुपार नंतर पूर्ण करा. जोडीदाराशी संवाद साधा. वाहने जपून चालवा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. संशय कल्लोळ टाळा. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. मन अस्थिर राहील.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) सौख्य लाभेल. सकाळ अनुकूल आहे. महत्वाची कामे पूर्ण करा.

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

9 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

10 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

10 hours ago