मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा आज करण्यात आली. यंदा बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली होती. परीक्षेनंतर पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्यामुळे निकाल वेळेवर लागतो की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. बोर्डातर्फे जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होईल, असे जाहीर करण्यात आले होते. कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत सूतोवाच केले होते. त्यानुसार उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
येथे पाहा निकाल
www.mahahsscboard.in
12bord