नाशिक

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

सावरगाव-हातगाव शिवारातील घटना; चारित्र्याच्या संशयातून प्रकार

पळाशी : वार्ताहर
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून करत, पतीनेही आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. नांदगाव तालुक्यातील सावरगावजवळील हातगाव (ता. चाळीसगाव) शिवारात सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला नंतर स्वतःला पतीने फाशी देऊन जीवनयात्रा संपल्याचे समजते. याप्रकरणी मृत पतीविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
सविस्तर वृत्त असे की, सावरगाव (ता. नांदगाव) व हातगाव (ता. चाळीसगाव) शिवारात सावरगाव येथील रहिवासी विजय सुखदेव चव्हाणके पत्नी, मुले व आई-वडील यांच्यासमवेत हातगाव शिवारात राहत होते. मूळचे सावरगाव येथील रहिवासी असलेले चव्हाणके कुटुंब हातगाव शिवारात विजय चव्हाणके पत्नी वर्षा (वय 40) व मुले, आई यांच्यासह हातगाव शिवारात राहत होता. त्याचे गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याचे आणि त्याच्या पत्नीचे कौटुंबिक कारणातून वाद होत असत. यातून तो पत्नी वर्षा यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत असत. सोमवारी (दि. 2) सकाळी 11.25 च्या सुमारास विजय चव्हाणके याने आपला मोठा भाऊ अशोक चव्हाणके यांना फोन करून मी माझ्या पत्नी वर्षाला संपवले असून, मीही माझ्या जीवाचे बरेवाईट करणार असल्याचे सांगितले. या घटनेने हादरलेल्या अशोक चव्हाणके यांनी कुटुंबासह भाऊ विजय चव्हाणके व त्याची पत्नी वर्षाच्या शोधासाठी शेतात धाव घेतली. शेतामध्ये असलेल्या बांधावरील आंब्याच्या झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला, तर त्याची पत्नी वर्षा शेतातील चार्‍यामध्ये मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याभोवती सुती दोरी गुंडाळलेली होती. त्यामुळे भाऊ विजय चव्हाणके याने त्याची पत्नी वर्षा हिच्या चारित्रावर संशय घेऊन, तिचा दोरीने गळा आवळून खून केला व विजय याने स्वतःसुद्धा शेताच्या बांधावरील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद भाऊ अशोक चव्हाणके यांनी दिली. त्यानुसार मृत विजय चव्हाणके याच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीणचे निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल राजपूत, हवालदार ओंकार सुतार व पथकाने घटनास्थळी धाव घेतली, या घटनेचा पंचनामे करून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले. घटनेने सावरगाव व हातगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार तपास करीत आहेत.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

21 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

21 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

21 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

21 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

22 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

22 hours ago