नाशिक

सुंदर मी होणार, पण आरोग्य सांभाळून!

शहरात वर्षाकाठी किमान शंभर महिलांची प्लास्टिक सर्जरी

नाशिक : देवयानी सोनार
‘जो दिखता हैं वही बिकता है’ या उक्तीप्रमाणे आजच्या जमान्यात प्रेझेंटेबल असणे, दिसणे गरजेचे झाले आहे. परंतु, सुंदर दिसण्याच्या नादात आरोग्याची वाट लागत आहे. नुकतेच मॉडेल शर्लिन चोप्रा हिने तिच्या ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरीबद्दल सोशल मीडियावर सांगितले. अनेक वर्षांपासून तिने लावलेले ब्रेस्ट इम्प्लांट तिच्या शरीराला त्रास देत असल्याने काढून टाकण्यात आल्याचे तिने सांगितले. या शस्त्रक्रियेमुळे तिला आता हलके वाटत आहे. तिला पाठदुखी, खांद्यामध्ये ताण, मान, छातीवर ओझे, तसेच झोपताना, रोजच्या दिनचर्येत वावरताना त्रास होत असल्याचे तिने सांगितले. आता ती म्हणते, खरे सौंदर्य तुमच्या वागण्या-बोलण्यात, तुमच्या स्वभावात असते. नाशिक शहरात वर्षाकाठी किमान शंभर महिला प्लास्टिक सर्जरी करत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

मनोरंजन क्षेत्रात अभिनेत्री किंवा अभिनेता यांना स्क्रीनवर चांगले दिसण्यासाठी कायम प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज पडते किंवा ते स्वतःहून करून घेतात.त्यामुळे चित्रपट, मालिका आणि आता सोशल मीडियावरही चांगले दिसण्यासाठी अट्टहास दिसतो. 36-24-36 हे सौंदर्याचे मापदंड, तसेच आपण सदैव प्रेझेंटेबल दिसले पाहिजे, हे अनेक वर्षांपासून मनावर कोरले गेले असल्याने शरीरावर अनैसर्गिक पद्धतीने विविध सर्जरी किंवा इम्प्लांट केले जात आहे; परंतु अनेकदा शरीराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून सर्जरी किंवा इम्प्लांट केले जात आहे. परिणामी, आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे चित्र आहे. मुली, महिलांच्या बाबतीत सुुंदर मी होणार, पण त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असणार्‍या मुली, महिला आहेत. आरोग्याची ऐशीतैशी करत सौंदर्य उपचार करून घेणार्‍या मुली, महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. सिलिकॉन जेलचे विविध वजनानुसार ब्रेस्ट इम्प्लांट केले जाते. आठवड्याला एक ते दोन ब्रेस्ट इम्प्लांट ऑपरेशन केली जातात.
यात 18 वषार्र्ंपासून ते 50 वर्षांपर्यंतच्या मुली, महिला या सर्जरी करून घेत आहेत. स्तनाच्या कॅन्सरमध्येही ब्रेस्ट इम्प्लांट केले जाते. हा इलनेस उद्भवलेल्या बर्‍याच अंशी स्त्रियांना इम्प्लांट काढल्यानंतर लक्षणांमध्ये सुधारणा होते. या सर्व गोष्टी प्लास्टिक सर्जन ब्रेस्ट इम्प्लांट करण्याआधी समजावून सांगतात. रुग्णानेही सांगितलेले पथ्य, सर्जरीनंतरची काळजी, ब्रेस्ट इम्प्लांटची मुदत व प्लास्टिक सर्जनची नियमित भेट या गोष्टींकडे लक्ष द्यावे.

नाशिकमध्ये वर्षाकाठी 50 ते 100 जणी प्लास्टिक सर्जरी करीत असून, त्यात नाकापासून ते ब्रेस्ट इम्प्लांटपर्यंत सर्वच प्रकारच्या सौंदर्याच्या मापदंडात बसेल अशा सर्जरी करण्याकडे कल वाढला आहे. ज्या स्त्रियांचे स्तन अगदी कमी आहेत, बाळंतपणात शरीर ढिले पडले आहे, अशा प्रकरणात ब्रेस्ट इम्प्लांट केले जाते. त्यामुळे चांगला आकार मिळतो. 250 ते 300 मिलीचे सिलिकॉन ब्रेस्ट इम्प्लांट केले जाते. मुली, महिलांच्या शरीरयष्टीनुसार तितक्या वजनाचे ब्रेस्ट इम्प्लांट सुचविले जातात. शर्लिन चोप्राच्या प्रकरणात प्रमाणापेक्षा जास्त ब्रेस्ट इम्प्लांट केल्यामुळे त्रास सुरू झाला, असे तज्ज्ञ सांगतात.

 शर्लिन चोप्रा

अलीकडे एका अभिनेत्रीच्या ब्रेस्ट इम्प्लांट काढण्याच्या शस्त्रक्रियेची चर्चा चालू आहे. महिलांना कुठल्या प्रकारचे ऑपरेशन, कुठल्या प्रकारचे ब्रेस्ट इम्प्लांट हे प्लास्टिक सर्जन रुग्णाच्या अपेक्षा इ. गोष्टींची चर्चा करवून ठरवतात. या सर्जरीचे धोके हे इतर कुठल्याही सर्जरीच्या, भुलेच्या धोक्यांसारखेच असतात. सुरुवातीच्या काळात दुखाव होणे, सेरोमा होणे, जंतुसंसर्ग होणे इत्यादी गोष्टी उद्भवू शकतात. कॅप्सुलर कॉन्ट्रक्चर होणे, स्तन घट्ट होणे, इम्प्लांट वर-खाली होणे, स्तनांच्या आकारात तफावत होणे, अशा गोष्टी होऊ शकतात.

डॉक्टर म्हणतात…

ब्रेस्ट इम्प्लांट इलनेस यात मान, पाठ, खांदे दुखणे, आजारी असल्यासारखे वाटणे, उत्साह न वाटणे, मनात गोंधळून जाणे इ. लक्षणे उद्भवतात. ब्रेस्ट इम्प्लांट इलनेस यास आजार असे संबोधावे किंवा नाही, याबद्दल डॉक्टरांमध्ये एकमत झालेले नाही. ब्रेस्ट इम्प्लांट केलेल्या किती महिलांमध्ये हा इलनेस उद्भवतो, याबद्दल अजूनही आकडेवारी समोर आलेली नाही.
– डॉ. अमित जाधव, प्लास्टिक सर्जन

सौंदर्याचे ठोकताळे मोडा, नैसर्गिक आरोग्याला प्राधान्य द्या. अशा उपचारांमुळे किंवा सुंंदर दिसण्याच्या अट्टहासामुळे आहार, झोप, व्यायाम यांचे संतुलन अनेकदा बिघडते. न्यूनगंड, आत्मविश्वास कमी होणे, औषधे किंवा हानिकारक पदार्थांचे सेवन, डिप्रेशन, व्यसनाधीनता, असे दुष्परिणाम दिसतात. याचा परिणाम कलाकारांसह सामान्य मुलं-मुलीही स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवू लागतात. नातेसंबंधांमध्येही या अवास्तव निकषांमुळे तणाव वाढतो. त्यामुळे सौंदर्याच्या ठोकताळ्यांची चुकीची समज मोडून नैसर्गिक आरोग्य, संतुलित आहार, नियमित व्यायाम, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य यावर आधारित सौंदर्याची नवी व्याख्या समाजाने स्वीकारणे आवश्यक आहे.
– डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचारतज्ज्ञ

चांगले दिसण्याचा जमाना आहे. त्यामुळे कोणतेही धोके न घेता जर ऑपरेशन होत असेल तर नक्की सुंदर दिसण्यासाठी असे उपचार करायला हवेत; परंतु ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्हायला हवेत.
-डॉ. सचिन वाघ, प्लास्टिक सर्जन

ब्रेस्ट इम्प्लांटमध्ये धोके असू शकतात. यात जंतुसंसर्ग होऊ शकतो. स्तनपान करताना अडचणी येत नाहीत; परंतु कधीकधी ते शक्य होत नाही. ज्या महिलांचे ब्रेस्ट कमी आहेत त्यांना ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करण्याची गरज नाही. स्तनाच्या कॅन्सर झालेल्या महिलांमध्ये ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केल्यास आत्मविश्वासाने त्या जगू शकतात.
– निवेदिता पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ

 

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago