नाशिक

लासलगाव – पिंपळगाव रस्त्यासाठी 45 कोटी मंजूर

मंत्री भुजबळ यांचे प्रयत्न; मार्च 2027 अखेर रस्त्याचे काम होणार पूर्ण

लासलगाव : वार्ताहर
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी आणि वाहतुकीसाठी
महत्त्वाचा असलेल्या
लासलगाव ते पिंपळगाव या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 45 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
निफाड, येवला, मनमाड, नांदगाव तालुक्यांतील नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांना पर्यायी मार्ग म्हणून लासलगाव व पिंपळगाव रस्त्याचे मजबुतीकरण करून रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार या रस्त्याच्या सुधारण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
त्यासाठी 45 कोटींचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येऊन मार्च 2027 अखेर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पिंपळगाव- पालखेड- लासलगाव हा 29 किलोमीटरचा रस्ता आहे. हा रस्ता त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड व नांदगाव (मनमाड) तालुक्यांना जोडणारा
राज्यमार्ग आहे.
संबंधित रस्त्यावर पिंपळगाव व लासलगाव बाजार समिती आहे. तसेच लासलगाव व मनमाड रेल्वे स्टेशन आहे. या कामामुळे लासलगाव रेल्वे स्टेशन ते पिंपळगाव (राष्ट्रीय महामार्ग) जोडला जाणार असून, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मनमाड, लासलगाव स्टेशन ते पिंपळगाव (राष्ट्रीय महामार्ग) यांना जोडणारा पर्यायी राज्यमार्ग आहे. तसेच हा रस्ता दिंडोरी तालुक्यातून त्र्यंबकेश्वरला जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग आहे.
लासलगाव शहरामधून गुजरात हद्द सावळदे, छडवेल, सटाणा, चांदवड, लासलगाव, विंचूर, सावळीविहीर (शिर्डी) रस्ता (रामा क्र. 7) हा जात असून, गुजरात राज्यातील शिर्डीला जाणार्‍या भाविकांची मोठी
वर्दळ असते.
तसेच सदर रस्त्यावर लासलगाव कांदा मार्केट असून, सिंहस्थ काळामध्ये कांदा वाहतुकीचा काळ असल्याने सदर वाहतूक सुरळीत होण्यासाठी सदर रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे.

शेतकरी, प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार

लासलगाव ते पिंपळगाव हा रस्ता लासलगाव-कोटमगाव चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावपर्यंत 10 मीटर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणाहून पुढे सारोळे खुर्दपर्यंत 7 मीटर रुंद काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे, तर सारोळे खुर्द ते लोणवाडीपर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामामुळे शेतकरी व इतर प्रवाशांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago