ऐन दिवाळीत इगतपुरी व घोटीत दोन युवकांचा खून
इगतपुरी : प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या दोन दिवसात इगतपुरी तालुक्यात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्धीत पिंप्री सदो येथे संजय देहाडे यांचा जमिनीच्या वादातुन खून झाल्याचे सोमवारी उघडकीस आले.
याप्रकरणी संशयित आरोपी उज्वला महेंद्र उबाळे, लताबाई बाळु उबाळे, नंदाबाई पटवर्धन उबाळे, पटवर्धन उबाळे यांच्या मुली बायडी उर्फ सुरेखा, सायली, सोनी, यशवंत उर्फ गोट्या उबाळे, प्रथमेश उबाळे, सिध्दार्थ उबाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी पोलिसांकडून पुढील तपास सुरु झाला आहे.
दुसरी खुनाची घटना घोटी पोलीस ठाण्याच्या हद्धीतील रामरावनगर घोटी येथे आज रात्रीच्या वेळेत घडली. रामराव नगर परिसरात पूर्ववैमनस्यातून दगडाने ठेचून प्रमोद शिंदे वय ३९ यांचा खून झालेला आहे. घोटी पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. संबंधित संशयित आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…