महाराष्ट्र

एक कोटीच्या लाच प्रकरणातील फरार कार्यकारी अभियंत्यास अखेर अटक

एक कोटीच्या लाच प्रकरणातील फरार कार्यकारी अभियंत्यास अखेर अटक
नाशिक: प्रतिनिधी
एक कोटीच्या लाच प्रकरणातील एमआयडीसी चा फरार कार्यकारी अभियंता गणेश वाघ यास अटक करण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागास अखेर यश आले असून त्याला अटक करून नगर येथील न्यायालयात हजर केले असता 19 नोव्हेबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
एमआयडीसी पोलीस स्टेशन अहमदनगर कडील गुन्हा रजिस्टर नंबर 1007/2023 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ,12 फरार गणेश लक्ष्मण वाघ यास ताब्यात घेतले, त्यास अटक करून आज अहमदनगर यांचे समोर हजर केले असता..मा.न्यायालयाने दि.19.11.2023.पर्यंत 6 दिवस कोठडी दिली. 1 कोटींची लाच घेताना पथकाने अमित गायकवाड यांना पकडले होते, या प्रकरणात गणेश वाघ याचा सहभाग होता, मात्र गुन्हा घडल्यापासून तो फरार होता, लाचलुचपत विभागाचे पथक त्यांच्या मागावर होते, अखेर पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी त्यास पकडले, आज न्यायालयात हजर केले असता6 दिवस कोठडी देण्यात आली.

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

17 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

17 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

17 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

18 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

18 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

18 hours ago