लाखोंचे कोरे चेक, स्टॅम्प, नोटरी दस्तऐवज जप्त
वडाळागाव : प्रतिनिधी
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या सावकारी व्यवसाय करणार्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात तक्रारदार प्रदीप गोविंदराव महाजन (वय 55, रा. मखमलाबाद रोड, पंचवटी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राहत अश्फाक अन्सारी (रा. रेहनुमाननगर, नाशिक) यांच्यासह काही संशयित व्यक्तींकडून अवैधरीत्या सावकारी व्यवसाय केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून विविध महत्त्वाचे दस्तऐवज व पुरावे जप्त करण्यात आले. त्यामध्ये कोरे चेक, हातउसनवारी पावत्या, नोटरी केलेले करारनामे, विविध बँकांचे चेक बुक्स, वाहन विक्री करारनामे, स्टॅम्पपेपरवरील व्यवहार, पासपोर्ट फोटो, आधार व पॅन कार्ड प्रती आणि बँक स्टेटमेंट आदींचा समावेश आहे. याशिवाय, व्यवहारांची नोंद असलेली 24 पाने असलेली नोटबुक व क्लासमेट कंपनीची ए-4 साइझची नोंदवहीही जप्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या कारवाईत मिळालेल्या दस्तऐवजांवर अनेक व्यक्तींच्या सह्या असून, त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर सावकारी व्यवहार केल्याचे संकेत मिळत आहेत. संशयित राहत अन्सारी यांच्याजवळून विविध बँकांचे चेकबुक व त्यांच्या खात्यांचे बँक स्टेटमेंटसुद्धा जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणात मुंबई नाका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 23, 39, 42 व 45 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर पाटील करत आहेत.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…