विंचूर दळवी, पांढुर्ली शिवारात अवैध वृक्षतोड उघड

टेम्पोसह चार ते साडेचार टन सुबाभूळ लाकूड जप्त

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील विंचूर दळवी व पांढुर्ली शिवारातील कडवा पाटालगत सुरू असलेली अवैध वृक्षतोड वनविभागाच्या कारवाईत उघडकीस आली. या कारवाईत वनविभागाने चार ते साडेचार टन सुबाभूळ प्रजातीचे लाकूड एका टेम्पोमधून जप्त केले आहे. या प्रकरणी संगमनेर येथील नवाब मोहम्मद पटेल याचे नाव संशयित म्हणून पुढे आले आहे.
बुधवारी (दि. 7) कडवा पाटाजवळ रात्रीच्या सुमारास अवैधरीत्या झाडे तोडून टेम्पोमध्ये लाकूड भरले जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संतोष हिंडे व कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे लाकडाने भरलेला टेम्पो
आढळून आला.
टेम्पोचालकाकडे लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी व कागदपत्रांची चौकशी केली असता कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे वनविभागाने गुन्हा नोंदवून सुबाभळीचे सुमारे चार ते साडेचार टन लाकूड असलेला टेम्पो (एमएच 10 झेड 9256) ताब्यात घेतला.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये अवैध वृक्षतोडीसंदर्भात चर्चा रंगली असून, वनविभागाकडून या अवैध वृक्षतोडीमागील साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास
सुरू आहे.

Illegal tree felling exposed in Vinchur Dalvi, Pandhurli Shivara

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *