गायींची अवैध वाहतूक करणारा आयशर पकडला

शिरवाडे फाट्यावर गोरक्षकांसह नागरिकांकडून रास्ता रोको

दिक्षी : प्रतिनिधी
पिंपळगाव बसवंत येथून जवळच असलेल्या शिरवाडे फाटा येथील जंगम पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी सकाळच्या सुमारास बजरंग गोरक्षकांनी गायींची अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो ताब्यात घेतला. या टेम्पोमध्ये अंदाजे 50 ते 60 गायी कोंबून वाहतूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ बजरंग दलाचे गोरक्षक व स्थानिक नागरिकांनी काही तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवासी व मालवाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. गायींची वैद्यकीय तपासणी, सुरक्षित निवारा तसेच संबंधित वाहनचालक व मालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, अधिकृत कारवाईनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *