नाशिक

अजितदादांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

नाशिक ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या रामकुंडावर सोमवारी (दि. 2) विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच अपघाती निधन झाले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांचा अस्थिकलश सोमवारी नाशिक येथे आणला. नाशिक येथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर रामकुंडावर अस्थींचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात
आले.
यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार जयवंत जाधव, भगूरच्या नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शरद आहेर, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, आनंद सोनवणे, सीमंतिनी कोकाटे, समाधान जेजुरकर, शंकर मोकळ, आशा भंदुरे, सुरेखा निमसे, ज्ञानेश्वर गायकवाड, तानाजी गायधनी, नरेश पाटील यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Immersion of Ajitdada’s ashes in Ramkund

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

24 seconds ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago