नाशिक ः प्रतिनिधी
माहेरपणाला आलेल्या गौराईंना काल जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.मुलगी सासरी जातांना आईवडिलांचा उर भरून येतो पुन्हा लेक माहेरा कधी येते याची वाट पहात निरोप दिला जातो.अशीच भावना गौरांईना निरोप देतांना कुटुंबाची झाली होती.तीन दिवसांचा गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कोरोनाच्या दोन वर्षानंतर सणाचा उत्साहात साजरे होत आहेत.
गौराईंंचे विसर्जन करण्यात आले.महालक्ष्मी,गौराई,ज्येष्ठा कनिष्ठा अशा विविध नावांनी ओळखल्या जातात. महालक्ष्मी माहेराला आल्यानंतर तीन दिवसात आगमन,पूजन,निरोप दिला जातो.
घरोघरी आपआपल्या परंपरेनुसार पूजा,आरती ,नैवेद्य दाखविण्यात आला.माहेरवाशीन आल्यानंतर तीच्या स्वागतासाठी संपूूर्ण कुटुंब महिनापंधरा दिवस अगोदर पासून तयारीला लागत असतात.पूजनाला विविध प्रकारचे नैवेद्य ङ्गराळ,ङ्गळांची आरास मांडण्यात आली. पुरणपोळी,आंबिल कथिलाचा नैवेद्य दाखविण्यात आला.पूजन आणि काल निरोपाच्या दिवशी हळदी कुंकवासाठी एकमेकंीकडे जावून दर्शन घेण्यात आले.
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…
संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…