शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बिल्वपत्रांनी गाठली शंभरी

पर्यावरण प्रेमींचे बेलाची झाडे सर्ंवधनावर भर
नाशिक ः प्रतिनिधी
हिंदू परंपरेत महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्व आहे.भगवान महादेवाला प्रिय असणारे बिल्वपत्रासाठी भाविकांना आता शंभर रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र आहे. शिवरात्रीच्या पूर्व संध्येला फुलबाजार तसेच शहर आणि उपनगरातील किरकोळ फुलविक्रेत्यांकडे बेलाच्या पानंाची मागणी वाढली आहे.बेलपत्रांची आवक बाजारात कमी झाल्याने भाव शंभरीपर्यत पोहचले आहेत.

 

 

 

 

बेलपत्रांची आवक घटल्याने भाववाढ झाली असल्याचे फुलविक्रेत्यांची म्हणणे आहे.तर सतत पाने काढल्याने झाडाची नैसर्गीक साखळी बिघडते त्यामुळे पर्यावरणप्रेमींचे झाडे वाचविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

 

 

 

शिवरात्रीनिमित्त भगवान महादेवांच्या पिंडीवर बेलपत्रांभिषेक करण्यात येतो.शहरातील विविध शिवमंदीरांमध्ये भगवान शंकराच्या पिंडीवर दृग्धाभिषेक,बिल्वाभिषेक करण्यात येतो.महादेवाच्या 108नावांचा जप करीत बेलपत्र वाहण्यात येते.
तत्पुर्वी श्रावणात किंवा इतर दिवशी किंवा दहा रुपयांना मिळणार्‍या 108 बेलपत्रांना गेल्या काही दिवसात चांगलीच मागणी वाढली आहे. आवक कमी झाल्याने मागील आठवड्यात 50 ते 60 रुपयाला 108 बेलपत्रांचा भाव राहीला होता.

 

 

 

पौराणिक कथेनुसार शंकराच्या तीन नेत्रांचे प्रतिक म्हणून तीन पानांचा बेल वाहण्यात येतो. बेलाच्या झाडांची संख्या कमी झालेले आहेत. महादेवाला प्रिय असणारे बेलपत्र सोेेेेेेेेेेेेेेेमवार,महाशिवरात्र,हरतालिका,श्रावण,प्रदोष यादिवशी मागणी वाढलेली असते.बेलपत्रासह महादेवास प्रिय असे पांढर्‍या ङ्गुलांनाही मागणी असते. परंतु बेलाची झाडे कमी असल्याने आवक कमी होते.शहर आणि आसपास असलेल्या बेलाच्या झाडांची पाने विक्रीस आणले जातात.बेलाच्या झाडाची पाने,बेलङ्गळचे आर्युवेदीक महत्व औषधी गुणधर्मासह आध्यात्मीक कारणांसाठीही बेलपत्रे आणि बेलङ्गळ वापरले जातात.

 

 

 

 

 

शिवमहापुराण कथेच्या प्रवचनाद्वारे प्रसिद्धीस आलेले मध्यप्रदेश येथील सिहोरवासी पंडीत प्रदीप मिश्रांच्या शिवकथा आणि विविध समस्येवर एक लोटा जल सर्व समस्या का हल अशी धारणा असल्याने अभिषेकासाठी गर्दी होत आहे.तसेच भाविकांची आस्था अजून वाढीला लागली असल्याचे चित्र आहे.परिणामी केवळ शिवरात्रच नाही तर इतर दिवशीही शिवालयांमध्ये शिवरात्रीच्या उत्सवाचे महत्व अजूनच अधोरेखीत असल्या कारणांने आज साजर्‍या होणार्‍या शिवरात्रीला मंदिरात पूजा,अभिषेक,आरती करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे.भाविकाना ङ्गुल बिल्वपत्र पुजा साहित्य घेण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

 

 

 

 

 

 

 

शहरात आधीच हे वृक्ष कमी झाले आहेत, ह्या वृक्षांची वाढ मुळताच हळु असते , आणि आपण सतत पान काढल्या मुळे झाडाची वाढ खुंटते, फुल येत नाहीत, फुल येत नाहीत म्हणून फळ धारणा होत नाही, म्हणजेच आपल्या अशा हस्तक्षेपा मुळे, झाडाची नैसर्गिक साखळी बिघडते.
शेखर गायकवाड
पर्यावरणप्रेमी(आपलं पर्यावरण संस्था)

 

 

 

 

 

शिवरात्रीसाठी बेलपत्र ङ्गुलबाजारात महाग मिळत असल्याने नाईलाजाने आम्हालाही भाववाढ करावी लागली आहे. झाडे कमी असल्याने आवकेवर परिणाम होत आहे.तसेच गेल्या काही दिवसांमध्ये बेलपत्रांना मागणी वाढली आहे.
सीमा नाईक
(फुलविक्रेती )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *