वणी परिसरात बाराशे जगदंबाभक्त बसल्या घटी

वणी : प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत असलेल्या जगदंबा मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. उदे गं अंबे उदे, जगदंबा माते की जय असा भगवतीचा जयघोष करीत घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेची पूजा सकाळी 9.30 वाजता सरपंच मधुकर भरसट व महसूल विभागाचे बाळकृष्ण भामरे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तर विजयादशमीपर्यंत सुरू राहणार्‍या या नवरात्रोत्सवात वणी व परिसरातील सुमारे बाराशे जगदंबाभक्त घटी बसतात. उपवास, व्रत व दुर्गासप्तशतीचे पाठ हे भाविक या काळात करीत असतात. यामुळे आपली इच्छित मनोकामना पूर्ण होत असल्याचा भक्तांमध्ये विश्वास आहे.
घटस्थापनेची पूजा रविवारी (दि. 11) सकाळी 9.30 वाजता सरपंच मधुकर भरसट व महसूल विभागाचे बाळकृष्ण भामरे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यानंतर जगदंबा देवीची महाआरती करण्यात आली.
याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, राकेश थोरात, रोशन जहागीरदार, पोपटराव थोरात, सुधीर दवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते. भगवतीचरणी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे, अशी प्रार्थना
केल्याचे मान्यवरांनी सांगितले.

In the Vani area, twelve hundred devotees of Goddess Jagdamba have installed the sacred *Ghat* (ritual pot).

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *