नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात अंगणवाडीसाठी मानधन प्रकल्पावरील मुख्यसेविका, सेविका, प्रभारी सेविका, मदतनीस नियुक्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्यांना मानधनवाढ द्यावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. त्यानुसार मानधनवाढीचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे.
महानगरपालिकेकडून शहरात 310 अंगणवाड्या चालवल्या जातात. सहाही विभागांतील बालकांना शिक्षणाचे धडे दिले जातात. अंगणवाडी मुख्यसेविका, प्रभारी सेविका यांच्या मानधनामध्ये प्रत्येकी 700 रुपये, प्रभारी सेविका यांच्या मानधनात प्रत्येकी 500 रुपये व मदतनीस यांच्या मानधनामध्ये प्रत्येकी 300 रुपये वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्ष 5 जून 2025 पासन वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास सध्याच्या मानधनानुसार येणार्या वार्षिक खर्चापेक्षा 29 लाख 19 हजार 600 रुपये इतका अतिरिक्त खर्च येणार आहे. सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात अंगणवाडी कर्मचारी मानधनासाठी संगणक कोड 5066 आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कर्मचारी संख्या वाढीव मानधन
मुख्यसेविका : 5 – 700 रुपये
प्रभारी मुख्यसेविका : 1 – 700 रुपये
सेविका : 299 – 500 रुपये
प्रभारी सेविका : 7 – 500 रुपये
मदतनीस : 287 – 300 रुपये
नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर तब्बल ३० महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी…
ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…
मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…