मनमाड-मुंबई समर एक्सप्रेस मध्ये भाजीपाला लोड करण्यासाठी मिळाला तीन मिनिटांचा अतिरिक्त वेळ
वेळ वाढवण्याच्या मागणीला अनेक संघटनांना यश
शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
लासलगाव प्रतिनिधी
मनमाड पासून सुटणाऱ्या सीएसएमटी स्टेशन मुंबई पर्यंत जाणाऱ्या 02102 क्रमांकाची ट्रेन लासलगाव येथे एक मिनिट थांबत होती त्यामुळे भाजीपाला आणि शेतमाल लोडिंग साठीचा परवाना लासलगाव स्टेशन वरून मिळत नव्हता.सदरच्या बाबीमुळे अनेक व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना त्यांचा माल मुंबईकडे घेऊन जाता येत नव्हता.रेल्वे थांबण्याची वेळ ही एक मिनिटापासून वाढून तीन मिनिटे केल्यास भाजीपाला वाहतुकीचा परवाना मिळू शकतो म्हणून गेल्या काही दिवसांपासून याबाबत अनेक संघटना रेल्वे प्रशासनाकडे तसेच केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडे मागणीचा पाठपुरावा करत होत्या त्या मागणीला यश आले आणि रेल्वे प्रशासनाने सदर रेल्वेची थांबण्याची वेळ ही तीन मिनिट केली त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि शेतकरी लासलगाव कडून मुंबईकडे भाजीपाला आणि शेतमाल पाठवू शकतील.
या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर व्यापारी,संघटनेचे बाळासाहेब सोनवणे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर तसेच केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांच्याकडे प्रयत्न आणि पाठपुरावा केला.सदर पाठपुरावाला यश आले.या कामी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे देखील मदत घेण्यात आली.
या प्रसंगी मागणीकर्त्यांनी शेतमालाचे पूजन करून लोडिंग केले.या वेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सचिन होळकर,माजी पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना नेते शिवा सुरासे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर गावडे,व्यापारी असोसिएशनचे बाळासाहेब सोनवणे,शिवाजी शिंदे,हरीश गवळी,हमीद शेख,प्रेम सोनवणे,रेल्वे प्रशासन आरसीएफ गवई,स्टेशन मॅनेजर पांडे,पार्सल पर्यवेक्षक जोशी आदी उपस्थित होते.सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मानसपुरे यांचे सचिन होळकर यांनी दूरध्वनीद्वारे आभार मानले.
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…