अफजल पठाण
बोटावरची शाई बोलकी झाली,
पाच वर्षांचा हिशेब मागू लागली,
शब्द नाहीत, घोषणा नाहीत,
एक रेघ आणि सत्तेची भाषा बदलली!
15 तारखेला मतदाराच्या बोटावर उमटणारी शाई ही केवळ मतदानाची खूण नसते, तर ती पाच वर्षांच्या कारभारावर मारलेली ठाम रेघ असते. प्रचाराच्या झगमगाटात, फलकांच्या जंगलात आणि घोषणांच्या गोंगाटात लपलेले अनेक संधीसाधू चेहरे त्या एका शाईच्या ठिपक्यात उघडे पडतात. निवडणूक म्हणजे जाहिरातींचा जल्लोष नव्हे, तर कामाचा हिशेब मागण्याची अंतिम वेळ असते, हे अनेक उमेदवार सोयीस्करपणे विसरतात. पाच वर्षे जनतेच्या दारात न फिरकणारे, नागरी प्रश्नांवर गप्प बसणारे आणि निवडणूक जवळ आली की अचानक लोकांमध्ये मिसळणारे हे चेहरे आज पुन्हा आश्वासनांची पेरणी करत आहेत. शब्द मोठे आहेत, दावे झगमगीत आहेत, पण कामाचा ताळेबंद पाहिला तर तो कोरा दिसतो. विकासाच्या नावाखाली स्वप्नं दाखवली गेली, पण प्रत्यक्षात शहराच्या समस्या मात्र फक्त कागदावरच फिरत राहिल्या.
बोटावर शाई, मनात सवाल,
खोट्या वचनांचा आज निकाल,
पाच वर्षांचा हिशेब मांडणारी,
एक रेघ ठरवते सत्तेचा काल.
ही शाई मतदाराची ताकद दाखवते. ती आवाज नसलेल्यांना आवाज देते आणि दिखाव्याच्या राजकारणाला आरसा दाखवते. ज्यांनी जनतेला गृहीत धरले, प्रश्नांना टाळले आणि सत्तेला सेवा नव्हे तर हक्क समजले, त्यांच्यासाठी ही शाई धोक्याची घंटा आहे. कारण मतदाराचा निर्णय शांत असतो, पण त्याचा परिणाम दूरगामी असतो. 15 तारखेला मतदार शांत असेल, पण भोळा नाही. बोटावर शाई लावताना तो फक्त उमेदवार निवडत नाही, तर दिखावा, दुटप्पीपणा आणि संधीसाधूपणाला नकार देतो. जे स्वतःला अपराजेय समजतात, ज्यांना सत्ता जन्मसिद्ध हक्क वाटतो, त्यांनी हे लक्षात ठेवावे-मतपेटी ही सर्वांत कठोर आणि निष्पक्ष न्यायालय आहे, आणि तिचा निकाल कुठल्याही दबावाला मानत नाही.
16 तारखेला ठरणार आहे फक्त सत्तेची दिशा नव्हे, तर नाशिकच्या राजकारणाचा दर्जा. मतदाराने डोळस निर्णय घेतला, तर केवळ चेहरे नाही तर राजकारणाची पातळी बदलेल. शाई लहान असते, पण तिचा ठसा मोठमोठ्या दाव्यांना जमीन दाखवणारा असतो-आणि हाच ठसा नाशिकच्या उद्याची दिशा ठरवणार आहे.
Ink on the 15th, direction on the 16th!
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…