नाशिक

सराईत मोटार सायकल चोरटे गजाआड

लासलगाव पोलिसांची कारवाई 

लासलगाव : समीर पठाण

लासलगाव शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गर्शनाखाली सुरू असलेल्या रात्रीच्या गस्ती दरम्यान दोन सराईत मोटारसायकल चोरट्यांना गजाआड करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
या प्रकरणी नजीर ईस्माईल शेख रा सोहमनगर लासलगाव यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार सायकल चोरीच्या व मालाविरुध्द घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सचिन पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, माधुरी केदार कांगणे अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, व सोमनाथ तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांनी केलेल्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे लासलगाव पोलीस ठाणे हददीत दररोज गस्तसाठी साध्या वेशात पोलीस पथक तयार करण्यात आलेले आहे.

सदर पथक हे दिनांक १७ मे २०२२ रोजी लासलगाव शहरात गस्त करत असतांना त्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार भुषण धोदमल हा त्याच्या साथीदारासह लासलगाव शहरात मोटार सायकलवर फिरत असल्याचे समजल्याने त्यांनी सदर मोटार सायकल स्वारास शोधुन मोटार सायकलचे कागदपत्र विषयी विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली तेव्हा दोन्ही संशियतांना पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्यांना नाव विचारले असता त्यांनी भुषण सुधाकर धोदमल वय २५ वर्षे रा सोहमनगर , लासलगाव मयूर विलास गरड वय २० वर्ष रा कॉलेज रोड लासलगाव ता निफाड असे नाव सांगितले.त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सोहमनगर लासलगाव येथुन मोटारसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली आहे .

सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे,सपोउनि शिवाजी घोडे,पोलीस हवालदार कैलास महाजन,पोलीस नाईक योगेश शिंदे,वाडीलाल जाधव व पोकॉ प्रदिप आजगे,कैलास मानकर,पोलीस नाईक देविदास पानसरे यांचे पथकाने सदर कामगिरी केली आहे.या आरोपींना मा न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे हे करीत आहे .

Ashvini Pande

Recent Posts

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

5 hours ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

1 day ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

2 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

2 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

2 days ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

2 days ago