पालक मेळावा, विद्यार्थी गुणगौरव व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
सिन्नर ः प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिन्नर नं.1 मध्ये सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या आणि आदर्श विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रवीण देवरे होते. व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिराज शेख, माध्यमिक शिक्षिका कीर्ती शिरसाठ, शरद जाधव, विकास उकाडे, पोलीस कर्मचारी गेणू सोनवणे, उपशिक्षक मनोहर आव्हाड, उपशिक्षिका शिल्पा गणोरे आदी उपस्थित होते. मंथन या स्पर्धा परीक्षेत शाळेतील 14 विद्यार्थी तर भारत टॅलेंट सर्च परीक्षेत चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलीस कर्मचारी गेणू सोनवणे यांच्या संकल्पनेतून व योगदानातून प्रत्येक तुकडीतील एका आदर्श विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आले. माध्यमिक शिक्षिका कीर्ती शिरसाठ, शरद जाधव, विकास उकाडे, गेणू सोनवणे यांचीही भाषणे झाली. उपशिक्षक मनोहर आव्हाड यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षिका शिल्पा गणोरे यांनी शासकीय योजना सांगितल्या. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सुनील शिंदे, प्रकाश दावळे, मोहिनी इंगळे, अश्विनी पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राजेंद्र शेजवळ, वंदना भडांगे, विलास ढोबळे, सुनीता बुवा, जयश्री गायकवाड यांनी सहकार्य केले.
शाळेला मुबलक प्रमाणात सुविधा उपलब्ध आहेत तरीसुद्धा मुलांना मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत जेवण करण्यासाठी, ऊन, वारा, पावसाचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथे डायनिंग हॉलची निर्मिती व दैनिक परिपाठासाठी मुलांना बसण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसविणे ही दोन्ही कामे करणे गरजेचे आहे. त्यामुळे समाज सहभागाचा तसेच काही सेवाभावी संस्थांच्या आणि एनजीओंच्या माध्यमातून या दोन्ही कामांचा पाठपुरावा करण्याचे काम सुरू आहे. माजी विद्यार्थी व सिन्नर शहरातील दानशूर व्यक्तींना याबाबत विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
– मनोहर आव्हाड
(उपक्रमशील शिक्षक)
*गाडी बंद रस्ता बंद...? मनमाडला वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त खासदार साहेब आम्हाला या जाचातुन मुक्त…
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…