गॅस एजन्सींच्या गोदामांची तपासणी; गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा
सिन्नर : प्रतिनिधी
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या
निर्देशानुसार सध्याची जागतिक परिस्थिती आणि इंधनाच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये तसेच त्याचा अवैध वापर (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्यासाठी सिन्नर तालुक्यात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मा. जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशानुसार गॅस एजन्सींच्या तपासणीसाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून, त्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातही तपासण्या केल्या जात आहेत.
घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी नाशिक जिल्हास्तरावर दक्षता व फिरते पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाद्वारे सर्व गॅस एजन्सींच्या गोदामांची वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा हॉटेल, व्यावसायिक वापर किंवा रिफिलिंगसाठी होणारा अवैध वापर रोखण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच गॅस वितरण प्रणाली सुरळीत सुरू आहे की नाही, याची खात्री करण्यासाठीही तपासणी केली जाणार आहे. दोषी आढळणार्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 तसेच गॅस पुरवठा व वितरण नियंत्रण आदेश अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ग्राहकांची दिशाभूल किंवा फसवणूक होत असल्याचे आढळल्यास संबंधित गॅस एजन्सीविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठविण्यात
येणार आहे. दरम्यान, तहसीलदार सिन्नर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गॅस सिलिंडरची बुकिंग नेहमीप्रमाणे नियमित कार्यपद्धतीनुसार करावी. सिन्नर तालुक्यातील सर्व गॅस एजन्सींमध्ये घरगुती सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने बुकिंग केलेल्या ग्राहकांना वेळेत सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. तसेच कोणत्याही ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ तहसील कार्यालय, सिन्नर येथे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिन्नर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकार्यांना आपल्या कार्यक्षेत्रात दक्ष राहून घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अवैध वापर किंवा साठेबाजी आढळल्यास तत्काळ पथकाच्या निदर्शनास आणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तपासणी पथकात यांचा समावेश
तालुकास्तरीय तपासणी पथकाचे प्रमुख तहसीलदार सिन्नर असून, संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी, पुरवठा निरीक्षण अधिकारी, वैधमापन निरीक्षक तसेच संबंधित तेल कंपनीचे विक्री अधिकारी हे पथकाचे सदस्य आहेत.
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…
शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…