राज्यात थंडीचा कडाका, ढगाळ हवामान

‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली

मुंबई : प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरातील मध्य-दक्षिण आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागावर निर्माण झालेल्या ‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता बुधवारी पहाटे साडेपाच वाजता वाढली. ते ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाच्या वार्‍यांसह 20 नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत मच्छलीपट्टणम ते पुरीदरम्यान उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
या वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामान निर्माण झाले असून, तापमानात चढ-उतार सुरू आहे. राज्यात गेल्या 24 तासांत सोलापूर येथे सर्वाधिक 34.4 अंश सेल्सिअस कमाल, तर जेऊर येथे नीचांकी 12 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Intense cold and cloudy weather in the state

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *