संपादकीय

जागतिक मधमाशी दिन

आज 20 मे, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिका पालन तज्ज्ञाचा 20 मे 1734 रोजी स्लोव्हनिया या देशातील गरीब कुटुंबात जन्म झाला. त्यांनी 1766 मध्ये युरोपात पहीले मधमाशी पालन केंद्र सुरू केले. 1771 मध्ये त्यांनी मधुमाशीपालनावरील पहिले पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने 20 मे 2018 पासून 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला. या दिवशी मधमाशांचे संवर्धन करण्यासह कीटकांचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती केली जाते. मधमाशी हा पर्यावरणातील अतिशय महत्वाचा घटक आहे. मधमाशी हे जीवसृष्टीला मिळालेले सर्वोत्तम वरदान आहे. मधमाशीला सामाजिक कीटक असे म्हटले जाते. मधमाशा इतर किटकांप्रमाणे एकट्या दुकट्या राहत नाही तर त्या समूह करून राहतात. त्यांच्या घराला पोळे असे म्हणतात. एका पोळ्यात हजारो मधमाशा असतात. मधमाशा त्यांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी फुलातील मकरंद आणि पराग गोळा करतात. मधमाशा एका फुलावरून दुसर्‍या फुलावर परागकणांचे स्थलांतर करतात त्यामुळे फुलांची बीजधारणा व फलधारणा होते त्यालाच परागीभवन असे म्हणतात. परागीभवनामुळे पीक उत्पादनात 25 ते 30 टक्के वाढ होते हे शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहे त्यामुळे मधमाशा या शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहेत. तरीही मधमाशीपालनाबाबत आपल्याकडील शेतकरी अजूनही गंभीर नाहीत उलट मधमाशांचे पोळे जाळून त्यांना शेतातून हाकलून देण्याकडेच शेतकर्‍यांचा कल असतो. पूर्वी शेतात, बांधावर, आजूबाजूला सहज नजरेस पडणारी मधमाशांची पोळे आता दिसत नाही. मधासाठी पोळे जाळणे, कीटकनाशके फवारणे, मोबाईल टॉवर उभारणे, मधमाशांविषयी अज्ञान पसरवणे या कारणांमुळे मधमाशी सारखा उपयुक्त जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील मधमाशा नष्ट झाल्या तर त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून आपण सर्वांनी मधमाशांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे. मधमाशांची शास्त्रिय माहिती घेऊन तिचे संगोपन करण्याचे तंत्र अवगत केले पाहिजे. पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असल्याने मध व मेन या बाबीपेक्षा उत्पादनातील वाढ हा महत्वाचा घटक मानून शेतकर्‍यांनी मधमाशी पालनाला अग्रक्रम द्यायला हवा. सरकारनेही याबाबत शेतकर्‍यांचे प्रबोधन करायला हवे. रोजगार निर्मितीला वाव असल्याने मधमाशी पालन हा पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मधमाशी ही आपल्यासाठी अतिशय महत्वाचे काम करते. मधमाशांकडून शिकण्यासारखेही खूप आहे. समूहात राहून आदर्श जीवन कसे जगावे हे मधमाशांकडून शिकावे. दीर्घ कष्ट केल्याने मधासारखा गोड पदार्थ निर्माण करता येतो हे मधमाशांनी दाखवून दिले आहे. मधमाशी हा केवळ मानवासाठीच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. आपण सर्वांनी मधमाशी वाचवण्याचा पर्यायाने जीवसृष्टी वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरच मधमाशी दिनाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल.
श्याम बसप्पा ठाणेदार

Ashvini Pande

Recent Posts

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

2 hours ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

18 hours ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

21 hours ago

शेतकरी ओळखपत्र आजपासून अनिवार्य

8 लाख 75 हजार 912 शेतकर्‍यांची फार्मर आयडीकडे पाठ सिन्नर : भरत घोटेकर कृषी विभागाच्या…

22 hours ago

घोटेवाडीत सहा ट्रॉली कडब्यासह 55 टन मुरघास आगीत भस्मसात

दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील घोटेवाडी येथील…

22 hours ago

नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन सायकल भेट

नाशिक : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन…

22 hours ago