नाशिक

भरदिवसा 70 लाखांची लूट करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

सिडको : प्रतिनिधी
पंचवटी परिसरात पोलिसांची बनावट ओळख सांगून एका व्यावसायिकाचे अपहरण करत बंदुकीच्या धाकावर 70 लाखांची रोकड लुटणार्‍या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने जेरबंद केले आहे. या कारवाईत एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून 82.10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला आहे.
पंचवटी परिसरात सरकारी दिवा असलेल्या इनोव्हा कारमधून येत पोलिसांची बनावट ओळख सांगून एका व्यक्तीचे अपहरण करून 70 लाखांची रोकड लुटणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून 82 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै 2026 रोजी दिंडोरी रोड, पंचवटी परिसरात दोन पुरुष आणि एका महिलेने सरकारी दिवा असलेल्या इनोव्हा कारमधून येत फिर्यादीला आपण पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत फिर्यादीला जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांच्याकडील 70 लाखांची रोकड आणि मोबाइल फोन हिसकावून घेतला. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी फिर्यादीला मुंबई-पुणे महामार्गावर सोडून दिले.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सात स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. मानवी गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यातील एक आरोपी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. मात्र, आरोपी मुंबईकडे रवाना झाल्याचे समजताच जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई-विरार परिसरात शोधमोहीम राबवून उर्वरित आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा (40, रा. रामनगर, आझमगड, उत्तर प्रदेश), सुजितकुमार राजकिशोर दुबे (32, रा. मोतीनगर, सिंदरी, धनबाद, झारखंड), नीलेश अशोक पका (27, रा. नागेबंदर, वसई) आणि संगीता हंसराज अहिरे (43, रा. कोणार्कनगर, नाशिक; मूळ रा. जळगाव) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून 55 लाख 10 हजार रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरण्यात आलेली सरकारी दिवा असलेली गोल्डन इनोव्हा कार, रिव्हॉल्वरसदृश शस्त्र, एमपी-5 रायफलसदृश शस्त्र, विविध शासकीय विभागांची बनावट ओळखपत्रे, बनावट रेल्वे पास आणि विविध सरकारी शिक्के जप्त करण्यात आले आहेत.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, बनावट ओळखपत्रे आणि शासकीय साहित्याचा वापर करून त्यांनी अन्य गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या टोळीकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1, नाशिक शहरशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या कारवाईत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 मधील तांत्रिक विश्लेषण, सायबर तपास, गोपनीय माहिती, रेकी आणि मुद्देमाल पुनर्प्राप्ती पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी विशेष कामगिरी बजावली.

Interstate gang that looted ₹70 lakh in broad daylight nabbed.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

6 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago