नाशिक

नाशिकमध्ये 14 हजार कोटींपर्यंतची गुंतवणूक

मंत्री सामंत ः चारशे एकर जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकर्‍यांशी चर्चा

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात येत्या काळात एका नामांकित कंपनीकडून पाच हजार ते 14 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याची आनंदवार्ता दिली आहे. या कंपनीसाठी लागणार्‍या चारशे एकर जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकर्‍यांशी चर्चा केली असून, वर्षभरात हा प्रकल्प सुरू होईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
उद्योजक संघटनांशी चर्चा करण्यासाठी नाशिक दौर्‍यावर आले असता, बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
नाशिकमध्ये राजूर बहुला येथील 25 एकर जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय आडगाव येथे यापूर्वीच जाहीर झालेल्या 15 एकर जागेवर आयटीपार्क मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करणार आहे. उद्योजकांना यापूर्वी द्यावा लागणारा दुहेरी फायर टॅक्स बंद करण्यात आला आहे. यासंदर्भात असलेला वाद सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत हा प्रश्न सुटलेला असेल, असेही ते म्हणाले. गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी 12 कोटींंचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार असून, त्यासाठी टेंडरही काढण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

प्रदर्शन केंद्र साकारले जाणार

गेल्या अनेक वर्षांपासून उद्योजकांकडून शहरात प्रदर्शन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत प्रदर्शन केंद्रासाठी जागेची उपलब्धता मनपा करून देणार असून, प्रदर्शन केंद्र उभारण्याचा खर्च एमआयडीसी करणार आहे. 11 वर्षे प्रदर्शन केंद्राचा वापर उद्योजकांना करता येणार व सिंहस्थातील एक वर्ष प्रदर्शन केंद्र मनपाकडून सिंहस्थासाठी वापरण्यात येणार आहे. प्रदर्शन केंद्राच्या उभारणीच्या निविदा काढण्याच्या सूचना दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago