मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
दावोस :
राज्यात अठरा देशांमधून सुमारे तीस लाख कोटींची गुंतवणूक येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल त्यांनी दावोस येथून संवाद साधत दावोस दौर्याची माहिती दिली. हा दौरा अत्यंत यशस्वी ठरल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणांवर समाधान व्यक्त केले. या दौर्यात ज्या गुंतवणुकीच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, त्या जवळपास 30 लाख कोटी रुपयांच्या आहेत. याशिवाय, आणखी 7 ते 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू असून, पुढील एक-दोन महिन्यांत त्या एमओयूच्या टप्प्यापर्यंत पोहोचतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या दौर्यात त्यांच्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमएमआरडीए आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी झालेल्या चर्चांमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुंतवणुकीमध्ये उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, तंत्रज्ञान यांचा समावेश असून, सुमारे 83 टक्के करार हे थेट परकीय गुंतवणूक स्वरूपातील आहेत. तर सुमारे 16 टक्के गुंतवणूक ही आर्थिक व तांत्रिक संस्थांसोबतची असून, त्यामध्ये एफडीआय कमी असली तरी अत्याधुनिक परदेशी तंत्रज्ञानाचा मोठा सहभाग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येणार आहे. यामध्ये अमेरिका, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम, स्वीडन, सिंगापूर, नेदरलँड्स, जपान, इटली, डेन्मार्क, नॉर्वे, स्पेन आदी देशांचा समावेश आहे. दावोस दौर्यामुळे महाराष्ट्राची जागतिक गुंतवणूक नकाशावर अधिक भक्कम ओळख निर्माण झाली असून, आगामी काळात रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल.
Investment worth Rs 30 lakh crore in Maharashtra from 18 countries
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…