अफजल पठाण /वडाळागाव प्रतिनिधी –
इस्लामची शिकवण काय आहे, ती कुराण शरीफ मध्ये मांडलेली आहे, भाषाही जो पर्यंत वाचण्यात नाही, तोपर्यंत त्याला समजणे कठीण आहे. इस्लाम १४४२ वर्षाचा इतिहास आहे. ६१० ते १४व्या शतका पर्यंत तसेच १५व्या शतका पासून ते आज पर्यंत. महिलांना जे अधिकारी आज सांगतात ते अधिकार हजरत मोहम्मद पैगंबर यांनी ते अधिकार आणि संरक्षण यापूर्वीच इस्लामच्या माध्यमातून दिले आहे. महिलांना वारसा हक्क देणारे इस्लाम आहे. ७५ वर्ष स्वातंत्र्य मिळूनही समग्र क्रांती घडू शकलेली नाही.असे प्रतिपादन ९वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी शनिवार (२८) रोजी संमेलनाचे उद्घाटन कार्यक्रमात गायकवाड सभागृहात ते बोलत होते.
व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम, हुसेन दलवाई,स्वागत अध्यक्ष इरफान शेख,माजी उपमहापौर गुलाम शेख, कार्याध्यक्ष हसन मुजावर आदी उपस्थित होते.
संमेलनाचे उद्घाटक हुसेन दलवाई म्हणाले की, चळवळीस अग्रक्रम करण्याचे कामे साहित्यिक करतात, आता साहित्याला धरूनच लढाई करावी लागणार आहे. असे त्यांनी सागितले.
अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनचे उद्घाटन हुसेन दलवाई यांच्या हस्ते वृक्षारोपण जलदान करून संपन्न करण्यात आला. चित्ररथ व पथनाट्य तसेच पुस्तक प्रकाशन करण्यात आले. दुपार नंतर दोन्ही ही परिसंवाद संपन्न झाले. संध्याकाळी फातिमा बीबीच्या लेकींचे कवी संमेलन संपन्न झाले
याप्रसंगी डॉ.इ जा तांबोळी, डॉ.युसुफ बेन्नूर, हसीब नदाफ, जावेद पाशा,अन्वर राजन, लियाकत नामोले, आयुब नल्लामंदू, चंद्रकांत गायकवाड, अकबर पटेल,मुर्तुजा काचवाला, डॉ. अलीम वकील, जावेद कुरेशी,अजीज नदाफ, फारुख शेख, अरुण घोडेराव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलोफर सैय्यद यांनी केले.