अकस्मात मृत्युच्या तपासा दरम्यान खुनाचा गुन्हा उघड
विंचूर दि.७(प्रतिनिधी) येथील पांडुरंग नगर मध्ये रहाणारे सैन्य दलातील माजी सैनिक बाळासाहेब लक्ष्मणराव पोतले यांचा पैशाच्या लालसेने दोन मित्रांनी मिळून घात केल्याची घटना उघडकीस आली आहे.अकस्मात मृत्यूच्या तपासा दरम्यान झाली खुनाच्या गुन्ह्याची उकल. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की. दि.१ जून २०२३ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास वैशाली किशोर शिंदे,रा. पांडुरंगनगर, विंचूर ता. निफाड, ह्या जेवणाचा डबा देण्यासाठी बाळासाहेब पोतले यांच्या घरी गेल्या असता.आवाज देऊन व दरवाजा वाजवून देखील पोतले हे दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी बाजूच्या खिडकीतून डोकावून बघितले असता बाळासाहेब पोतले हे कॉटवर मृत अवस्थेत दिसून आले. यामुळे वैशाली शिंदे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यास खबरी दिली. वैशाली शिंदे यांच्या खबरी वरुन लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु रजि. नं. ३२/२०२३ फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला. अकस्मात मृत्युचा तपास पोलीस नाईक योगेश शिंदे हे करत होते.तपासा दरम्यान नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, नाशिक ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड अतिरिक्त कार्यभार निफाड उप विभागचे सोहेल शेख यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस नाईक योगेश शिंदे, पो.कॉ.प्रदिप आजगे, व पो.कॉ. कैलास मानकर यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते. अकस्मात मृत्युच्या तपासा दरम्यान व घटनास्थळाचे पाहणी वरुन तपास पथकास घातपात झाल्याचा संशय आल्याने तपास पथकाने त्यादृष्टीने तपास सुरू केला असता तपास पथकास मयत बाळासाहेब पोतले यांचे मित्र रामदास सालकाडे व सुनिल मोरे दोघे रा विंचूर ता. निफाड यांचे मयताकडे दारु पिण्यासाठी वारंवार येणे जाणे असायचे परंतू बाळासाहेब पोतले हे मयत झाले पासुन रामदास सालकाडे व सुनिल मोरे हे गावातुन निघून गेल्याची गोपनीय माहिती तपास पथकास मिळाली. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयीत रामदास सालकाडे व सुनिल मोरे यांचा शोध घेवून त्यांचेकडे सखोल विचारपुस करता त्यांनी त्यांचा मयत मित्र बाळासाहेब पोतले यांचे दारु पिण्याचे कारणावरुन आपआपसात बाचाबाची होऊन मयतास कॉटवर जोरात लोटुन दिले व नंतर नाक व तोंड दाबुन मारल्याची कबुली दिली आहे. बाळासाहेब पोतले यांच्या शरीराची कुठलीही हालचाल होत नसल्याची खात्री झाल्यावर आरोपींनी बाळासाहेब पोतले यांचा मोबाईल हॅन्डसेट, शर्ट व पॅन्ट मधील रोख रक्कम, एटीएम कार्ड व चेकबुक तसेच कारची चावी घेवून ते. मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार क्र. एम. एच १५एफ.एफ.५३६९ या कारसह घटनास्थळावरून पळ काढला.आरोपी क्र.१) रामदास मारुती सालकाडे, रा. सालकाडे वस्ती, (किसानवाडी) विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक, आरोपी क्र.२) सुनिल माणिक मोरे, रा. (किसानवाडी) विंचूर ता. निफाड, जि. नाशिक यांना निफाड. न्यायालयात निफाड येथे हजर केले असता मा न्यायालयाने दिनांक ९ जून २०२३पर्यंत आरोपींना पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ पो.ना. योगेश शिंदे, पो.कॉ. प्रदिप आजगे, पो.कॉ. कैलास मानकर हे करीत आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…