बुधवार, ७ जून २०२३. जेष्ठ कृष्ण चतुर्थी. ग्रीष्म ऋतू, शोभन नाम संवत्सर. राशिभविष्य –

 

राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

 

आज शुभ दिवस आहे. संकष्ट चतुर्थी नाशिकचा चंद्रोदय रात्री १०.४२ वाजता. घबाड रात्री ९.०३ पर्यंत.

 

चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.

 

मेष:- करार करताना काळजी घ्या. अनितीने वागू नका. गृहकलह होऊ शकतो. संध्याकाळ आनंदाची.

 

वृषभ:- प्रवासात अडथळे येतील. उच्च शिक्षणात संभ्रम निर्माण होईल. वहन सावकाश चालवा. जलप्रवास घडेल.

 

मिथुन:- अस्वस्थ करणारा दिवस आहे. काहीसा तणाव वाढेल. दगदग होईल. विश्र्नाती घ्या.

 

कर्क:- कामे मार्गी लागतील. मात्र भागीदारीत वाद संभवतात. शत्रू त्रास जाणवेल. पत्नीशी मतभेद होतील.

 

सिंह:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. उत्साह वाढेल. तीर्थाटन घडेल. विनाकारण खर्च होईल.

 

कन्या:- कामात अडथळे निर्माण होतील. मन अस्वस्थ राहील. हुरहूर दाटेल. दानधर्म कराल. आवडत्या व्यक्तीसाठी खर्च होईल.

 

तुळ:- पत्नीशी मतभेद संभवतात. शत्रू डोके वर काढतील. घरात शांतता राखा. नोकरीत प्रलोभने टाळा.

 

वृश्चिक:- आर्थिक आवक वाढेल. मात्र अनितीने उत्पन्न नको. सरकारी कामातून त्रास जाणवेल. प्रवासात अडथळे.

 

धनु:- खर्च वाढू शकतात. विनाकारण एखाद्या प्रकरणात मानसिक त्रास होऊ शकतो. संतती ची चिंता लागून राहील.

 

मकर:- काहीसा तणावपूर्ण दिवस आहे. शेती आणि घराच्या संबंधित कामात अडथळे येतील. मात्र संध्याकाळ आनंदात व्यतीत कराल.

 

कुंभ:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. गुरू सन्निध लाभेल. द्रव पदार्थापासून त्रास संभवतो. कौटूंबिक प्रश्न सुटतील.

 

मीन:- अनुकूल दिवस आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. येणी वसूल होण्यास वेळ लागेल. प्रवासात धाडस नको.

 

(. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

17 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

17 hours ago