उत्तर महाराष्ट्र

ऐकाव ते नवलच ! चोरट्यांनी ड्रेनेजची जाळीच चोरून नेली

नाशिकरोड : प्रतिनिधी

जेलरोड येथील भगवती लॉन्स समोरून जाणार्‍या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरुन ड्रेनेज ची जाळीच चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या ड्रेनेज लाईनवर जाळी नसल्याने दुचाकी थेट त्याच्या मध्ये जाऊन अपघात होऊन जिवितहानी होण्याची भीती आहे.
काही दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम झाले. त्यामुळे काही महिन्यापुर्वी खड्ड्यांचे साम्राज्य असलेला रस्ता चांगला झाला आहे. त्यामुळे वाहतूक वाढली असून अनेक दुचाकीधारक वाहने सुसाट पळवत असतात. मात्र अशावेळी ड्रेनेज वरील लोखंडी जाळी नसल्याने अपघात होऊ शकतो. येथून दररोज सायकल वर जाणार्‍या शालेय विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. तसेच दुचाकीस्वार, चार चाकी वाहणे देखील मोठ्या संख्येने जातात. एखादा अपघात होण्यापूर्वी पालिकेच्या संबधित विभागाने या ड्रेनेजवरील चोरी गेलेली जाळी तात्काळ बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  चोरटय़ांना लोखंडी जाळी काढताच कशी आली, याचा अर्थ ही जाळी पक्की लावली नव्हती का, ठेकेदाराने केवळ वरच्या वर ही जाळी लावली होती का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.
अपघात होण्यापूर्वी जाळी लावा
ड्रेनेजची जाळी चोरी गेल्याने येथे अपघात होऊ शकतो, रात्रीच्या वेळी काहीच समजणार नाही, थेट दुचाकीच या नाल्यात जाण्याची भीती आहे. अपघात होण्यापूर्वी पालिकेने तात्काळ लक्ष घालून याची ही दुरुस्ती करावी. जाळी बसविताना ती मजबूत लावावी जेणेकरून पुन्हा अशा पद्धतीने चोरी होणार नाही. पालिकेने जर ही जाळी लावली नाहीतर पालिके विरोधात आंदोलन करू.
विलासराज गायकवाड, जिल्हाध्यक्ष, जनसुराज्य शक्ती पक्षाचे
Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

20 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago