खासदार संजय राऊत यांना 3 दिवसांची ईडी कोठडी

खासदार संजय राऊत यांना 3  दिवसांची ईडी कोठडी
मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केलेल्या खासदार संजय राऊत यांना आज ईडीने 3 दिवसांची ईडी कोठडी सुनावली. 4 ऑगस्टपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली. संजय राऊत यांची तब्बल सतरा तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना काल मध्यरात्री अटक केली होती. आज सकाळी राऊत यांना जे.जे. रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांनंतर त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर केल्यानंतर ईडीच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. संजय राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांनी एक कोटी सहा लाख रुपये संजय राऊत यांच्या नावावर ट्रान्झंक्शन झाले. या पैशांतून संजय राऊत यांनी मालमत्ता खरेदी केल्या. संजय राऊत यांना दर महिन्याला प्रवीण राऊत यांच्याकडून दोन लाख रुपये दिले जात होते. 1 कोटी 20 लाखात अलिबागमधील जमीन खरेदी केली.प्रवीण राऊत हा फक्त फ्रन्ट मॅन आहे. सर्व घोटाळा संजय राऊत यांनी केला आहे. असा दावा ईडीच्या वकिलांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संजय राऊत यांना आठ दिवसांची ईडी कोठडीची मागणी करण्यात आली. राऊत यांचे वकिल अशोक मुंदरगी यांनी संजय राऊत यांची बाजू मांडताना राजकीय सुडापोटी अटक केली. राज्यातील सत्ता बदलल्यामुळे राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली. रोख रकमेचा व्यवहार झाला असला तरी त्याचा तपास आता कसा करणार? आणि राऊत हे तपासाला सहकार्य करीत आहेत. त्यामुळे कमीत कमी कोठडी द्यावी. संजय राऊत यांना हदयविकाराचा त्रास आहे. राऊत कोठडीत असताना त्यांना वकिलांशी सल्लामसलत करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी राऊत यांच्या वकिलांनी केली. या सर्व मागण्या न्यायालयाने मान्य करुन त्यांना घरचे जेवण, औषधे देण्याची परवानगी दिली.
दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश देशपांडे यांनी राऊत यांना 3 दिवसांची ईडी कोठडी दिली.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago