सटाणा प्रतिनिधी :
तालूक्यातील केळझर(गोपाळ सागर)धरण भरल्याने आज बागलाणचे आमदार दिलीप बोरसे व परीसरातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले .
बागलाण तालुक्यातील आरम खोऱ्यास वरदान ठरलेले 572 दलघफु क्षमता असलेले केळझर (गोपाळ सागर) धरण या वर्षी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात भरल्याने आरम खोऱ्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. आज दि 21 रोजी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे,बाजार समितीचे सभापती पंकज ठाकरे, संचालक संजय सोनवणे,जि प सदस्य मीना मोरे, पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती आहिरे, बाजार समितीच्या संचालिका रत्नमाला सुर्यवंशी यांच्या हस्ते धरणाच्या पाण्याचे विधिवत जलपुजन करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, बाजार समिती संचालक तुकाराम देशमुख, माजी उपसभापती मधुकर ठाकरे, दिलीप आहिरे, मुन्ना सूर्यवंशी, बाळासाहेब वाघ, सुनील वाघ, सुरेश मोरे, चंद्रकांत मानकर, अरुण भामरे, पाट बंधारे विभागाचे उपअभियंता अभिजित रौदळ केळझर कृती समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले की, या धरणाचे जनक स्वर्गीय गोपाळराव मोरे यांच्या स्मारकासाठी 20 लक्ष रुपये आमदार निधीतून देण्यात आले आहेत लवकरच स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना आमदार बोरसे यांनी दिली.
नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार नाशिक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन…
मंत्रिमंडळाचा निर्णय; दुकानदारांमध्ये नाराजी नाशिक : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या…
नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर नाशिक : प्रतिनिधी शहरात होणार्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या…
अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दशकापासून…
मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई सिन्नर : प्रतिनिधी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा…
गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती सटाणा ः प्रतिनिधी ईव्हीएम मॅनेज…