महाराष्ट्र

‘लाडकी बहीण’वरून जुगलबंदी

2,100 रुपये कधी देणार?; विरोधकांकडून गदारोळ

मुंबई :
विधानसभा निवडणुकांमध्ये आपला करिश्मा दाखवलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अद्याप चलती आहे. राज्यकर्त्यांकडून प्रत्येक कार्यक्रमात, भाषणात, निवडणूक प्रचारात आणि विधिमंडळात देखील लाडकी बहीण योजनेचा गवगवा केला जातो. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच महायुतीला मोठे यश मिळाले असून, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देत आहेत.
विरोधकांकडून या योजनेमुळे सरकारवर होत असलेल्या आर्थिक कर्जावर भाष्य केले जाते, तसेच या योजनेतील घोषणेप्रमाणे 2,100 रुपये बहिणींना कधी मिळणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. विधिमंडळात काल लाडकी बहीण योजनेवरून मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार जयंत पाटील चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.
लाडकी बहीण योजनेवरील चर्चेदरम्यान, विधानसभेत 1 नंबर आणि 2 नंबरहून जयंत पाटील आणि शंभूराज यांच्यात जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाली.
लाडकी बहीण योजना आणणारी व्यक्ती 2 नंबरवर आला, असे शिवसेना नेते शंभूराज देसाईंनी म्हटल्याचा उल्लेख जयंत पाटलांनी सभागृहात केला. 1 नंबरचा माणूस इथे नाही म्हणून शंभूराज आता 1 आणि 2 नंबरबाबत बोलत आहेत, असेही पाटील यांनी म्हटले. त्यावर मी वेगळे काही बोललो नाही, मुख्यमंत्री म्हणाले होते आम्ही आमच्या-आमच्यात पद बदलत असतो तेच मी बोललो, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते तथा मंत्री शंभूराज देसाईंनी दिले. राज्य सरकारला या ’लाडक्या बहीण योजनेने फायदा झाला.’ मात्र, ज्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली ते 1 चे 2 नंबर झाले,असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यावर, एकनाथ शिंदे कायम 2 नंबरचं राहतील असे नाही. पदांची अदलाबदल होत असते, असा पलटवार शंभुराज देसाई यांनी केला. निवडणुकीत जेव्हा ही योजना झाली, तेव्हा अशा अटी यापूर्वी सांगितल्या होत्या का?, ज्या लोकांनी याचा चुकीचे फायदे घेतले त्यांच्यावर कारवाई करणार का? योजना जड जाऊ लागल्याने आता अटी आणि कंडीशन योजनांमध्ये घेतले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांच्या या आरोपावर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्तुत्तर दिले. अनेक महिलांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे त्या महिलांनी या पैशांसाठी घरातील कर्त्या पुरूषाचे खाते दिले आहे. यासाठीच केवायसी आपण केली अशी माहिती आदिती तटकरेंनी सभागृहात दिली.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

15 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

15 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

16 hours ago