सिडको : विशेष प्रतिनिधी
एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकलेल्या कमेंटचा राग मनात धरून तब्बल 30 ते 35 जणांनी एका नागरिकाच्या घरात घुसून त्याच्या आईला धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राहतो त्या ‘देवो के देव महादेव’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजी अभिनेत्री राखी सावंत यांच्याविषयीची एक बातमी शेअर झाली होती. त्याखाली फिर्यादीने विनोदी स्वरूपाची टिप्पणी केली. मात्र, ही गोष्ट काही सदस्यांच्या रागाची ठरली. त्या दिवशी सायंकाळच्या सुमारास संजय कुटे, किशोर जाधव, सचिन शिंदे, श्रीकांत पगार, अमोल जाधव, रोशन कदम यांच्यासह 25 ते 30 जणांचा मोठा जमाव जनरल अरुण वैद्यनगर, पोर्णिमा स्टॉप येथे फिर्यादीच्या घरी पोहोचला. त्यावेळी फिर्यादी घरी नसताना या जमावाने घरात जबरदस्ती प्रवेश केला.
संजय कुटे याने फिर्यादीच्या आईकडील मोबाइल फोन हिसकावून घेतला आणि त्यांना धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत तिच्या अंगाला हात लावल्याने तिला मानसिक त्रास झाला, असे फिर्यादीने नमूद केले आहे. शिवाय जमावाने फोनवरून फिर्यादीलाही शिवीगाळ करून ‘बघून घेऊ’ अशी धमकी दिली. या घटनेची नोंद 9 डिसेंबर रोजी करण्यात आली. या दंगेखोरांनी घरात घुसून महिलेला धमकावल्यामुळे परिसरातही एकच खळबळ उडाली आहे. कायद्याचे उल्लंघन करून हातात न्याय घेण्याचा प्रयत्न करणार्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…