लासलगाव : वार्ताहर
मार्च एन्डच्या तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज शनिवार दि २ मार्च रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ व लाल कांद्याची अंदाजे १६ ते १७ हजार क्विंटल आवक झाली.३० तारखेपासून मार्च एन्ड मुळे बाजार समितीला तीन दिवस सुट्टी असल्याने बाजार समितीचे कामकाज बंद होते.आज शनिवारी शेतकऱ्यांनी कांदा विक्री करण्यासाठी येथील बाजार समितीत गर्दी केली.
२९ तारखेच्या तुलनेत आज शनिवारी उन्हाळ कांद्याच्या सरासरी बाजारभावात २०० रुपयांची घसरण झाली तर लाल कांद्याच्या सरासरी बाजारभावात १०० रुपयांची घसरण पहायला मिळाली.लासलगाव बाजार समितीत उन्हाळा व लाल कांद्याची १६ ते १७ हजार क्विंटल आवक होऊन उन्हाळा कांद्याचे बाजारभाव किमान ४०० रुपये, कमाल १२५२ रुपये तर सरासरी भाव १००० रुपये प्रति क्विंटल राहिले तर लाल कांद्याचे बाजार भाव किमान ३०० रुपये,कमाल ९०३ रुपये तर सरासरी भाव ७०० रुपये होते
हंगामाच्या सुरुवातीला असलेला विक्रमी दर जास्त काळ २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होणारा कांदा आता कमीतकमी ३०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल वर येऊन ठेपला.यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.आता कांदा उत्पादक शेतकरी मोठा चिंतेत सापडला आहे.कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा तोट्यात विक्री करत असताना आता दुष्काळात तेरावा महिना अशी परस्थिती निर्माण झाली आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…