मानवी इतिहासात डोकावून बघितले तर असे दिसून येते की, अगदी अनादी काळापासून त्याच्या धार्मिक जाणिवा जागृत आहेत. फक्त फरक एवढाच की काळाच्या ओघात त्यामध्ये फरक पडत गेला आणि आजच्या त्याच्या धार्मिक रूढी-परंपरा स्थिर झाल्या. अगदी प्राचीन काळी निसर्गात त्याला जे जे भीतिदायक दिसले त्याला सुरुवातीला त्याने देव मानले, त्याची श्रद्धा दृढ होत गेली.
वरुण देवता, अग्निदेवता, सविता, मित्र, वृक्षदेवता, विष्णू, ब्रह्मांड इत्यादी अनेक देवतांची तो पूजा करू लागला. काळाच्या ओघात ज्योतिषशास्त्राशी संबंधित ग्रंथ तयार झाले. ज्योतिष पद्धती ही हिंदूंचे प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेले एक शास्त्र असून, मानवी जन्माच्या वेळी आकाशातील ग्रहांची स्थिती कशी असते त्यावरून त्या व्यक्तींची कुंडली बनविणे व त्यावर आधारित भाष्य म्हणजेच भविष्य करणे होय. या भविष्यशास्त्रावर आधारित ग्रह-तार्यांची दिशा बघणे सुरू झाले. परंतु अलीकडच्या काळात मानव जेव्हा चंद्रावर जाऊन पोहोचला आहे, अशा परिस्थितीमध्ये तो प्रत्येक घटनेचा वैज्ञानिक कारण समजू शकतो. तरी तो बर्याच अंशी दैववादावर अवलंबून राहताना दिसतो. जरी खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र आपल्या प्राचीन साहित्याचे व शास्त्राचे प्रतिनिधित्व जरी करत असले तरी वर्तमानात निर्णय घेताना आपण त्याच्या किती आहारी जायचे? हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. श्रद्धा व अंधश्रद्धा यामध्ये असलेला बारीक धागा आपल्याला पकडता आला पाहिजे.
शनीला शांत करण्याच्या नादात हजारो लिटरचे तेल त्याच्या मूर्तीवर ओतण्याआधी ते किती जणांच्या भाजीला कामा येतील हा विचार आपण करावा किंवा मंगल असलेली मुलगी किंवा मुलगा आपला जीवनसाथी म्हणून निवडताना आपण मांगलिक नाही म्हणून चांगला जीवनसाथी सोडण्याआधी त्या व्यक्तीचे गुण कर्तृत्व एकदा तपासून आपण पाहिले पाहिजे. त्यामुळे आपण कर्मा पेक्षा दैववादाच्या किती आहारी जायचे हे आपण निश्चित केले पाहिजे, अन्यथा अति तेथे माती व्हायला वेळ लागणार नाही.
एखाद्या कामात यश मिळाले नाही तर ते आपल्या नशिबात नव्हते म्हणून सोडून देणारे आपल्या आजूबाजूला असंख्य आहेत, पण यश मिळो अथवा न मिळो मी स्वीकारलेला मार्ग हा चांगलाच आहे, असे आपणच आपल्या निर्णयावर ठाम राहिलो तर कार्यसिद्धी सहज शक्य आहे.
ज्योतिष! म्हणजे ज्योती म्हणजे प्रकाश, म्हणजे मार्ग दाखविणारा अशी जर व्याख्या केली तर हे शास्त्र आपणास नक्की दिशादर्शक ठरेल. दुःखापासून मुक्ती मिळावी म्हणून खरे तर मानव या सगळ्या चक्रात अडकलेला दिसतो. पण, गौतम बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे अत्त दीपो भव म्हणजे स्वयंप्रकाशित आपण झालो तर…. तर नक्कीच आपल्याला चांगला मार्ग व यश मिळू शकते.
आपल्या नशिबापेक्षा कर्मावर आपले लक्ष असले पाहिजे. कोणी तरी ज्योतिषांनी सांगितले की तुम्हाला कोरोना होणारच नाही तुमच्या कुंडलीत योग नाही.. तर आपण विना मास्कचे फिरणार आहोत का?
म्हणजे आपण रिस्क घेणार नाही,
हीच श्रद्धा व अंधश्रद्धामधली बारीक रेषा आहे. ती आपल्याला पकडता आली पाहिजे.
आपल्या कर्माची, आपल्या लग्नाची, आपल्या जन्माची दिशा ठरविताना सूर्यग्रहण आहे म्हणून किंवा चंद्र हा आज उगवणार नाही म्हणजे आज अमावास्या आहे म्हणून थांबणे की आज मला जी संधी या क्षणाला मिळत आहे ती कॅच करून पुढे मार्गक्रमण करणे ही खरे तर आजची गरज आहे. मला सांगायचे फक्त एवढेच आहे की, ज्यावेळी मानव हा विविध प्रश्नांना सामोरे जात असतो किंवा त्याला काही समस्या असतील तर तो कळत नकळत भक्तीच्या मागे लागतो.
तिथून सुरू होतो तो नशीब जाणून घेण्याचा प्रवास, अशा वेळी पोपटाच्या मुखातून चिठ्ठी काढून दे रे हरी खाटल्यावरी, अशी भूमिका न ठेवता आपणही या ग्रह तार्यांप्रमाणे न थांबता अविरत आपले मार्गक्रमण करीत राहिले पाहिजे. तेव्हाच यश आपले असेल म्हणून ज्योतिषशास्त्र हे जरी भारतीय शास्त्रोउत्पतीमधील उत्तम प्राचीन ग्रंथ असले तरी त्याच प्राचीन संस्कृतीमधील भगवद्गीता सांगते कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.
कर्म करणे माणसाच्या हातात आहे, पण आपल्या कर्मावर प्रभाव टाकणार्या इतर बाबींवर आपले नियंत्रण नसते. कर्मांचे फळ मिळाले नाही तर माणूस निराश होतो. आज यामुळेच आपण बघतो की पीक चांगले आले नाही की शेतकरी आत्महत्या करतात किंवा पेपरमध्ये नापास झाल्याने विद्यार्थी ही आत्महत्या करतात. कर्माची अपेक्षा न ठेवता उत्तम रीतीने कर्म करणे, हे जर शेतकरीराजाला कळले तर तो कुठल्याही परिस्थितीत निराश होणार नाही. आत्महत्या न करता पुन्हा पुढच्या पिकाच्या तयारीला लागेल. त्याचप्रमाणे विद्यार्थीही पुन्हा जोमाने अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करतील .
सांगायचे तात्पर्य एवढंच की, आपण आपले कार्य करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे, तरच यश आपले आहे. अन्यथा निराशेच्या खोल दरीतून आपल्याला कोणतेही शास्त्र वाचवू शकणार नाही. तेव्हा सकारात्मक ऊर्जा मिळतील अशा व्यक्ती, प्रसंग, घटना इ.च्या आपण सान्निध्यात असणे आवश्यक आहे. उद्यमेन ही सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः

प्रा. कीर्ती वर्मा