पाच वर्षांत 77 कोटी सात लाख 75 हजार रुपयांची उलाढाल
लासलगाव ः समीर पठाण
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची आशिया खंडातील कांद्याची नामांकित बाजारपेठ ही ओळख स्थापना होऊन 78 वर्षे पूर्ण झाले तरी कायम आहे. कांद्याबरोबरच द्राक्ष आणि आता मिरचीचे आगार म्हणून येथून सात किलोमीटरवरील बाजार समितीचे खानगाव नजीक तात्पुरते खरेदी केंद्र नावारूपास येत आहे.
गेल्या पाच वर्षांत या खरेदी केंद्रावर 8 लाख 74 हजार 462.06 क्विंटल मिरची व द्राक्षमणी, भाजीपाला आवक होऊन 167 कोटी 38 लाख 14 हजार 589 इतक्या रुपयांची उलाढाल झाली. त्यात मिरचीची दोन लाख 91 हजार 602 क्विंटल आवक होऊन 77 कोटी सात लाख 75 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. लासलगाव बाजार समितीने खानगाव नजीक येथे 2002 मध्ये तात्पुरते खरेदी केंद्र सुरू केले. सुरुवातीला 12 वर्षे येथे केवळ द्राक्षमणी लिलाव होत. 2014 मध्ये निफाड तालुक्यातील उत्तरपूर्व भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षांऐवजी मिरची पिकाकडे वळले. मिरची लागवडीची सुरुवात सारोळे खुर्द या गावातून झाली. ती इतक्या झपाट्याने वाढत गेली आणि काही वर्षांत खानगाव नजीक येथे मिरची केंद्र उभारणीसाठी परिसरातील मिरची उत्पादकांनी मागणी केली. त्यास लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रतिसाद दिल्याने मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नंदुरबार, महाराष्ट्रातील मोठे मिरचीचे व्यापार केंद्राप्रमाणे मिरची विक्रीचे हब निर्माण
होत आहे.
लासलगाव बाजार समितीचे खानगावनजीक खरेदी केंद्र येथे लिलाव झाल्यानंतर ठसकेबाज लवंगी मिरची, साधी मिरची आणि उपाहारगृहात अत्यावश्यक झालेली ढोबळी मिरची, शेडनेटमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणारी लाल, पिवळी, हिरवी, ढोबळी मिरची असे मिरचीचे बहुविध प्रकार आता लासलगाव मार्गे लंडन, ओमान, कतार, दुबई, जर्मनीसह संपूर्ण जगात पोहोचत आहे. सन 2020 पासून या खरेदी केंद्रावर भाजीपाला लिलावाला सुरुवात होऊन आता प्रामुख्याने हिरवी मिरची विक्रीचे हब झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना मोठा फायदा होत आहे. निफाड व चांदवड तालुक्यातून तसेच नांदगाव, येवला, वैजापूर या तालुक्यातून हिरवी मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. त्यात प्रामुख्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, बलराम, ज्वाला, ज्वेलरी, सितारा हे मिरचीचे वाण विक्रीसाठी येत असतात.
खानगावनजीक खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून द्राक्षमण्यांबरोबरच मिरची पिकाला चांगला भाव मिळत असल्याने परिसरात मिरची उत्पादकांचा मिरची उत्पादन घेण्याकडे कल वाढला आहे. यामुळे दरवर्षी आवकदेखील वाढत आहे. उत्पादक, व्यापारी, कामगार घटकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा लासलगाव बाजार समितीचा प्रयत्न असून, खानगावनजीक खरेदी केंद्रासाठी साडेतीन हेक्टर जागा संपादित करण्याचा बाजार समिती संचालक मंडळाचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
– डी. के. जगताप (सभापती, कृषी
उत्पन्न बाजार समिती, लासलगाव)
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…