भारतनगर भागातील खळबळजनक घटना
नाशिक : प्रतिनिधी
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले खुनाचे सत्र सुरूच असून आज मध्यरात्री प्रेमप्रकरणातून भारत नगर येथे एका युवकाची धारदार शस्रने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली, सागर रावतर असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सहाजण ताब्यात घेतले आहेत. प्रेम संबंधावरून झालेल्या वादात मध्यस्थी केल्यामुळे तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
घाव वर्मी लागल्याने रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. हे तिघेही सख्ख्ये-चुलत भावंड आहेत. घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी भेट देऊन पाहणी केली. संशयित आरोपी भोये याचे परिसरातच राहणाऱ्या एका मुलीशी प्रेम संबंध होते, त्या मुलीशी भोये याचे सतत भांडण होत या भांडणात मृत युवक मध्यस्थी करायचा. त्या रागातून या युवकाचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.