सप्तशृंगीदेवी ट्रस्ट रुग्णालयात भाविक डॉक्टरांच्या प्रतीक्षेत

सप्तशृंगगड: वार्ताहर

सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांना तसेच येथील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत ट्रस्ट अतिशय जागरूक असल्याचे बोलले जात आहे . प्रत्यक्षात मात्र गडावरील धर्मार्थ दवाखान्याची इमारत ही केवळ शोभेची वास्तू बनली असून , या रुग्णालयात गेल्या चार महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने विशेष करून भाविकांचे व येथील ग्रामस्थांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत .

 

हेही वाचा: सप्तशृंगी मंदिर गर्भगृहाला चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाची झळाळी

हृदयाचा डिफिब्रीलेटर हृदयाला संकट समयी हृदय सुरू ठेवण्यासाठी सुरक्षा देणारे उपकरण यंत्र धर्मार्थ रुग्णालयास भेट दिले आहे . परंतु हे यंत्र चालविण्यासाठी येथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने हे यंत्र शोभेची वस्तू बनली आहे . येथे दोन दिवसांपूर्वी ३२ वर्षीय तरुण युवकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला .

हेही वाचा : सप्तशृंगी मातेच्या चैत्र उत्सवास प्रारंभ

या धर्मार्थ रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध असते तर वेळीच उपचार करून या युवकाचे प्राण वाचले असते . येथे धर्मार्थ दवाखान्यात डॉक्टर नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे . तसेच भारतीय स्टेट बँकेच्या निधीतून भाविक व ग्रामस्थांच्या रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी कार्डियाक रुग्णवाहिका भेट दिली आहे . परंतु डॉक्टर नसल्याकारणाने त्या रुग्णवाहिकाचा वापर होत नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *