किचन टिप्स

साबूदाणे भिजवताना पाण्यात चार मोठे चमचे ताक व लागेल एवढे मीठ घालावे. खिचडी फोडणीला घातल्यानंतर पांच मिनिटांत तयार होते. गॅसजवळ उभे राहून दहा-बारा वेळा ढवळले असता बघता बघता खिचडी फुलून येते. वेळेच्या आधी गॅस बंद करावा कारण गरम भांड्यात ती शिजतच असते.
नेहमीची कांदा, टोमॅटोची कोशिंबीर, कोथिंबीर जरा तिखट, त्यामध्ये चीज किसून घाला मस्त लागते.
नेहमीची केळ्याची शिकरण –पण त्यातील एखादे केळे मिक्सरमध्ये पेस्ट केले आणि नारळाच्या दुधात शिकरण केले -सोबत जायफळ, वेलचीचा स्वाद आणि शाहीपणासाठी केशर सिरप, बदाम काप/पूड, पिस्ता काप (ऐच्छिक) की झाली शाही शिकरण!!
नेहमीचे साखर घालून दूध -त्यात बदाम पावडर, केशर सिरप, काजू पावडर, पिस्ता काप, वेलची /जायफळ स्वाद –शाही मसाला दूध!
डोसा क्रिस्पी होण्यासाठी भिजवताना तांदळात 1 चमचा साबूदाणे व एक चमचा चण्याची डाळ घालावी, मस्त कुरकुरीत होतात आणि इडल्यासाठी तांदळात थोडे मेथी दाने घालावे, छान मऊ होतात.
मूठभर कुरमुरे घालून वाटल्याने पण इडल्या हलक्या होतात आणि एक टेबलस्पून लोणीही घालावे.
केळ्यांच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास केळी 4-5 दिवस जास्त टिकतात. आपण केळी एकाद्या फडक्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवली तरीही वरून जरी काळी दिसली तरी आत उत्तम राहतात …..किमान 4, 5 दिवस!
पुर्‍या खुसखुशीत होण्यासाठी कणीक मळताना तिच्यात थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावी.
फ्लॉवर शिजवताना त्यात दूध व किंचित मीठ घालून शिजवावे म्हणजे फ्लॉवर पांढराशुभ्र व तजेलदार राहतो.
ब्रेडक्रम्स जर टिकाऊ आणि झटपट हवे असतील तर साध्या पावाच्या स्लाईसच्या ऐवजी टोस्ट किवा कडक पाव वापरा! एकदम फाइन ब्रेडक्रम्स होतात.
भेंडीची भाजी बनवताना त्यात 1-2 लिंबूच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी चिकट होणार नाही. पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषले
जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *