कच्च्या कैरीचे झटपट होणारे सरबत..
साहित्य…एक मध्यम आकाराची कैरी, साखर, मीठ, काळं मीठ चवीनुसार, थंड पाणी व बर्फ ऐच्छिक..
कृती..
प्रथम कैरीची साल काढून घ्या. तिच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात कैरीच्या फोडी, चवीनुसार मीठ व साखर घालून बारीक वाटून घ्या. नंतर आवडीनुसार काळे मीठ व थोडे पाणी घालून फिरवून घ्या..हे सर्व दुसर्या भांड्यात काढून तुमच्या चवीनुसार आणखी आवश्यक असेल तसे मीठ, साखर व पाणी घाला.. मस्त थंडगार कैरीचे झटपट सरबत तयार..
जसे आवडेल तसे थंड पाणी किंवा बर्फ घाला..आवडत असेल तर चार पुदिन्याची पाने बारीक करतानाच घाला..
पन्हे तर नेहमीच करतो, पण या पद्धतीने सरबत करून बघा.. एका मध्यम आकाराच्या कैरीचे चार ते पाच ग्लास सरबत आरामात
होते..
– समृद्धी जोशी, कोल्हापूर