नाशिक

मविप्र रुग्णालयात बे्रन डेड रुग्णाच्या किडनीचे प्रत्यारोपण

विठाबाई सोनवणे यांच्या अवयवदानाने रुग्णाला मिळाले नवजीवन!

नाशिक : प्रतिनिधी
वैद्यकीय क्षेत्रात नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि अवयवदानाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारी घटना समोर आली आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र अर्थात, मविप्र रुग्णालयात इतिहासात प्रथमच अत्यंत गुंतागुंतीची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.
येवला तालुक्यातील विसापूर येथील रहिवासी असलेल्या दिवंगत विठाबाई सोनवणे यांच्या अवयवदानातून मिळालेल्या एका किडनीचे मविप्र रुग्णालयातच एका गरजू रुग्णावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे व अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी दिली.
येवला येथील विठाबाई सोनवणे या मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत धाडसी आणि सामाजिक भान राखणारा निर्णय घेतला. विठाबाईंचा मुलगा दत्तू प्रकाश सोनवणे आणि मुलगी दिपाली आहेर यांनी दुःखद प्रसंगी संयम राखत अवयवदानाला परवानगी दिली. त्यांच्या या निर्णयामुळेच मविप्र रुग्णालयाच्या इतिहासातील पहिल्या किडनी प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा झाला आणि एका रुग्णाला नवजीवन मिळाले.
शासनाच्या ‘झेडटीसीसी’च्या नियमावलीनुसार आणि अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वेगाने राबवण्यात आली. मविप्र रुग्णालयातील सर्जरी विभाग, मेडिसीन विभाग, भूलशास्त्र विभाग आणि ट्रान्सप्लांट टीममधील डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफच्या पथकाने यासाठी अहोरात्र विशेष परिश्रम घेतले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील सेवक बापू सोनवणे यांनी नातेवाईक आणि रुग्णालयाचा समन्वय करून मोलाचे सहकार्य केले.
नाशिक जिल्ह्यातच अशा प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याने रुग्णांना आता मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरलेली नाही, असे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी सांगितले .

Kidney transplant from a brain-dead patient at MVP Hospital.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

7 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

7 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

7 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago