सिडको विशेष प्रतिनिधी :-पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल व चॉपर दाखवत पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणारा आणि पोलिसांना हवा असलेला एक सराईत गुन्हेगार अखेर पकडला आहे. गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने सातपूर परिसरातून त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीचे नाव किशोर बळीराम बरू असे आहे. त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात खंडणीसह मारहाण, धमकी तसेच शस्त्र बाळगण्याचे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांकडून गुन्हेशाखेला देण्यात आल्या होत्या.
या प्रकरणातील संशयित आरोपी किशोर बरु हा सातपुर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती युनिट क्रमांक १ च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने सापळा लावला आणि आरोपी आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडीही दिली आहे.
किशोर बरू याच्यावर नाशिक शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये खून, मारहाण, जबरी चोरी, शस्त्रबंद हल्ले आणि गँगस्टर कायद्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे तो पोलिसांच्या वॉंटेड यादीत होता.
ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी केली
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…