नाशिक शिक्षक मतदार संघात किशोर दराडे विजयी

नाशिक शिक्षक मतदार संघात किशोर दराडे विजयी

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शिक्षक मतदार संघाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला असून, महायुती चे उमेदवार किशोर दराडे हे विजयी घोषित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हे अशी तिरंगी लढत झाली. त्यात दराडे यांनी बाजी मारली. एकूण 64 हजार मतदान झाले होते. विजयासाठी31 हजारांचा कोटा ठरवण्यात आला होता. हा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. त्यात दराडे हे विजयी झाले. विजयानंतर महायुती च्या कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.

अपेक्षित विजय : मंत्री दादा भुसे

नाशिक शिक्षक मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय हा अपेक्षित होता. गेल्या सहा वर्ष त्यांनी केलेल्या कामाची ही पावती आहे. शिक्षक हे विकासाचे व्हिजन ठेवून मतदान करत असतात. भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना विकासाचे कार्य कोण करू शकते याचा विश्वास असल्याने आज आमचे उमेदवार पुन्हा विजयी झाले.  मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्षकांनी विश्वास दाखवला आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेवू. आ. किशोर दराडे हे येणारे 6 वर्ष शिक्षकांच्या समस्या सोडवतील हा विश्वास आहे. निवडणुकीदरम्यान अनेक वावड्या उठविण्यात आल्या मात्र सुज्ञ मतदारांनी या बाबींना थारा दिला नाही. पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात शिवसेना व महायुती अभेद्य असल्याचे अधोरेखित झाले.

– दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक

Bhagwat Udavant

Recent Posts

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला   शहापूर :  साजिद शेख एका…

1 hour ago

आलिशान कारच्या काळ्या काचाआड दडले होते काय? पोलिसांनाही बसला धक्का!

अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…

7 hours ago

उज्ज्वल निकम होणार खासदार

उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…

10 hours ago

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्षपदावरून पाय उतार

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी…

1 day ago

नाशिक जिल्हा परिषदेच्या त्या अधिकाऱ्यावर अखेर निलंबन कारवाई, लैंगिक छळ केल्याच्या तक्रारींची दखल

नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर तब्बल ३० महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी…

2 days ago

येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…

4 days ago