नाशिक

येवल्यात पहिल्या दिवशी पतंगांची धूम

आकाश झाले पतंगमय; युवकांचा अमाप उत्साह

येवला : प्रतिनिधी
मकरसंक्रांतीनिमित्त भोगीच्या पहिल्या दिवशी ढोल-ताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अन् अमाप उत्साहाच्या वातावरणात येवला शहरात पतंग महोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी शहरातील आकाशात लाखो पतंग झेपावले. पतंग उडविण्यासाठी शहरातील इमारत, तसेच घरांच्या गच्चीवर युवकांनी पतंग हातात घेऊन पतंगोत्सवाला प्रारंभ केला. तीन दिवस चालणार्‍या या पतंगोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे.
वकाट… काटे… बढाव… बढाव… अशा विविध आवाजाने शहर दुमदुमून गेले. रंगीबेरंगी, तसेच विविध प्रकारचे आकर्षक पतंग आकाशात झेपावले. युवक-युवती, बच्चेकंपनी आदींनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. दिवसभर हवेच्या कमी- जास्त प्रमाणामुळे पतंगप्रेमींचा थोडा हिरमोड झाला. मात्र, दुपारी तीननंतर हवेच्या वेगाने गती घेतल्यामुळे पतंग अधिक प्रमाणात हवेत झेपावले. यानिमित्ताने शहरातील सर्व आकाश पतंगमय झाले होते.
मकरसंक्रांतीनिमित्ताने पाहुणे मंडळी येवल्यात दाखल झाली आहे. या मंडळींनीदेखील पतंग उडविण्याचा आनंद लुटला. शहरातील इमारती व गच्चीवर ध्वनिवर्धक लावण्यात आले. शहरातील प्रसिद्ध वाद्य हलकडीच्या तालावर युवकांनी ठेका धरला. काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात युवकांनी ठेका धरला. पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून नायलॉन मांजावर बंदी असल्याने शहरात साध्या मांजाचा वापर करून पतंग महोत्सव साजरा करण्यात
येत आहे.
पतंगप्रेमींनी यंदा प्रशासनाच्या कायद्याचे पालन करून साध्या मांजाचा वापर करून पतंगोत्सवाला सुरुवात केली. तीन दिवस चालणार्‍या पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापर करण्यात येऊ नये, यासाठी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, मुख्याधिकारी तुषार आहेर, पालिकेच्या स्वच्छता विभागप्रमुख पूनम भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायलॉन मांजाविरोधी पथक शहरात नेमण्यात आले आहे. पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर कोणी केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस व नगरपालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, आज, बुधवारी संक्रांत असल्याने यापेक्षा अधिक प्रमाणात पतंग हवेत झेपावतील.

Kite flying on the first day in Yeola

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago