नाशिक

राजकारणाबरोबर पर्यावरणाची जबाबदारी; मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण

नाशिक : प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना ना. महाजन यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमात राजकारणाबरोबर पर्यावरणाचीदेखील जबाबदारी पार पाडली आहे व आपली हरित नाशिक मोहीम निवडणुकीच्या काळातही जोमाने चालू ठेवली आहे.
‘होमेथॉन 2025’मध्ये नरेडकोने वृक्षलागवड करण्यासंदर्भात अभियान राबविले होते. काल प्रत्यक्षात जयेश ठक्कर, समन्वयक – होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो-2025 नरेडको नाशिकतर्फे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मखमलाबाद, सर्व्हे नं. 312 येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
‘होमेथॉन 2025’ या भव्य रिअल इस्टेट प्रदर्शनादरम्यान जितके नागरिक व पाहुणे सहभागी झाले, तितकी झाडे लावण्याची जी बांधिलकी नरेडको नाशिकने स्वीकारली होती, ती या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरवण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदामंत्री व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. पर्यावरण रक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित नाशिक घडवण्याच्या दिशेने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नरेडको नाशिकचे अध्यक्ष सुनील गवादे यांनी सांगितले की, रिअल इस्टेट क्षेत्र विकास करत असताना पर्यावरणाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. ‘होमेथॉन 2025’मध्ये दिलेली झाडे लावण्याची हमी आम्ही प्रत्यक्षात पूर्ण केली आहे. हा केवळ कार्यक्रम नसून, ही नरेडको नाशिकची दीर्घकालीन हरित बांधिलकी आहे. शहरातील सर्व घटकांना सोबत घेत हरित नाशिकची जबाबदारी पार पाडू, याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला नरेडको नाशिकचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये नरेडको नाशिक अध्यक्ष सुनील गवादे, जयेश ठक्कर, सचिव शंतनू देशपांडे, हर्षल धांडे, भाविक ठक्कर, ललित अग्रवाल, अभय नेरकर, परेश शाह, प्रशांत पाटील, मयूर कपाटे, हर्षल पाटील, आकाश कापडणे, गिरीश मालानी, नितीन सोनावणे, सुयोग कोठावदे, आर्किटेक्ट संजय म्हाळस, शशांक देशपांडे, आशिष जाधव, संजय कोठावदे, डॉ. मुकेश अग्रवाल, विनोद लुथ्रा, हरिभाऊ भोर, योगायोग नर्सरीचे गोकुळ पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago