नाईक संस्थेत अध्यक्षपदी परिवर्तनचे कोंडाजी आव्हाड सरचिटणीसपदी प्रगतीचे हेमंत धात्रक विजयी

नाईक संस्थेत अध्यक्षपदी परिवर्तनचे कोंडाजी आव्हाड

सरचिटणीसपदी प्रगतीचे हेमंत धात्रक विजयी

सत्ताधारी थोरे यांच्यासह माजी आमदार सानप पराभूत

नाशिक: प्रतिनिधी
व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संमिश्र निकाल लागले असून सर्वाधिक जागा वर तानाजी जायभावे व सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्या  प्रगती पॅनलने बाजी मारली, मात्र अध्यक्ष पदी परिवर्तन पॅनलचे  कोंडाजी मामा आव्हाड व उपाध्यक्ष पदी  उदय घुगे यांनी बाजी मारली तर सह चिटणीस पदी दिगंबर गिते हे विजयी झाले. सत्ताधारी पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवले गेलेल्या क्रांतिवीर पॅनल आणि मनोज बुरकुले आणि अभिजीत दिघोळे यांच्या नव ऊर्जा पॅनलला या  निवडणुकीत भोपळा ही फोडता आला नाही,

या निवडणुकीत सत्ताधारी संचालक, अध्यक्ष यांच्या सह माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पराभव पत्करावा लागला, प्रगती पॅनलचे सर्वाधिक उमेदवार विजयी होऊनही अध्यक्ष पदावर मात्र परिवर्तन पॅनलचे कोंडाजी मामा आव्हाड हे विजयी झाले. त्यांनी विध्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे व तानाजी जायभावे यांचा पराभव केला. कोंडाजी आव्हाड (२२३२) ॲड तानाजी जायभावे २१०४
पंढरीनाथ थोरे १९४९ अशी मते मिळाली,१२८ मतांनी  कोंडाजी आव्हाड हे विजयी झाले. तर सरचिटणीस पदासाठी हेमंत धात्रक २५३२ ( प्रगती ) २४८ मतांनी विजयी झाले. बाळासाहेब सानप २२८४ शिवाजी मानकर १३०८ मते मिळाली.

नाईक शिक्षण संस्थेची 2024 ते 2029साठीची पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया पार पडली. 29 जागा साठी 118 उमेदवार रिंगणात होते. यंदा प्रथमच चार पॅनलमध्ये निवडणूक झाली असून निवडणुकीसाठी 82 टक्के मतदान झाले होते त्यामुळे निकालाची उत्सुकता निर्माण झाली होती.
प्रचारादरम्यान भ्रष्टाचार, गैरकारभार, संस्थेच्या दूरवस्थेसारख्या अाराेप-प्रत्याराेपांनीही ही निवडणूक गाजली.

विजयी उमेदवार असे

असे आहे विजयी उमेदवार (मिळालेली मते)
विश्वस्त :
प्रगती : दामोदर मानकर(२५५३), अशोक नागरे (२१०६), बबनराव सानप (२०९९), नामदेव काकड (२०६८), नारायण काकड (२०४९)
परिवर्तन : लक्ष्मणराव जायभावे (२२३५)
—– —– —–
कार्यकारी संचालक
नाशिक तालुक्यासह शहर
प्रगती: प्रकाश घुगे (२५४१), प्रल्हाद काकड(२४३९), बाळासाहेब धात्रक (२३२५)
परिवर्तन: गोकुळ काकड (२२२२)
——- —–
सिन्नर
प्रगती : जयंत आव्हाड (२४८१), समाधान गायकवाड (२४७३), हेमंत नाईक (२३३९)
—- —–
निफाड
प्रगती : पुंजाहरी काळे (२५०४), बंडू दराडे (२३५३)
परिवर्तन : उध्दव कुटे (२३३६
दिंडोरी गट
प्रगती
शरद बोडके २५९३
राजेश दरगोडे २३५०
परिवर्तन पॅनेल
सुभाष आव्हाड २३०४

येवला प्रगती : रमेश नामदेव वाघ (२३३७), संपत वाघ (२३२३)
नांदगाव : प्रगती
त्रंबक डोंगरे २३५३
किशोर लहाने २६ ०५
महिला गट
प्रगती पॅनल : रेखा कातकडे (2551),नंदा भाबड (2416)

अध्यक्ष : कोंडाजी आव्हाड(परिवर्तन)
उपाध्यक्ष: उदय घुगे (परिवर्तन)
सरचिटणीस: हेमंत धात्रक (प्रगती)
सहचिटणीस: दिगंबर गिते (2912)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *