नाशिक

नाशकात 12 ते 16 मार्चदरम्यान कृषिकुंभ

नवतंत्रज्ञानाची शेतकर्‍यांना माहिती देणे, हा मुख्य हेतू

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्याच्या कृषी वैभवाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि शेतकर्‍यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी कृषिकुंभ-2026, नाशिक जिल्हा कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शन सज्ज झाले आहे. नाशिक जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, आत्मा आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कृषिकुंभ दि. 12 ते 16 मार्चदरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत यूथ फेस्टिव्हल मैदान येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.
कृषिकुंभला सर्वांना मोफत प्रवेश आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकर्‍यांना कृषिकुंभला येण्याची संधी मिळावी, यासाठी गाव-खेड्यातून 1,387 बसचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतीविषयक नवीन उत्पादन पद्धती, नवीन तंत्रज्ञान, एआय आणि ड्रोनचे थेट प्रात्यक्षिक हे शेतकर्‍यात जागरूकता निर्माण करणारे ठरणार आहे. केवळ चर्चा न करता कृषी अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली एआय तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शेतकर्‍यांना दिले जाणार आहे. शेतीची कामे सुलभ करणार्‍या ड्रोन तंत्रज्ञानाचे लाइव्ह डेमो याठिकाणी पाहायला मिळणार आहेत.

खाद्यसंस्कृतीचा जागर

नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची खाऊ गल्ली हे विशेष आकर्षण असेल. यासोबतच थेट शेतकर्‍यांकडून दर्जेदार धान्य खरेदी करण्यासाठी धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

मनोरंजनाची मेजवानी

संध्याकाळच्या सत्रात दि. 14 रोजी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकारांचे कार्यक्रम व दि. 15 रोजी फोक लोक हा पारंपरिक लोककलेचा आविष्कार प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

महिला शेतकरी सन्मान

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त या महोत्सवात महिला शेतकर्‍यांच्या योगदानाचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. प्रयोगशील शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना सन्मानित केले जाईल. दि. 13, 14 व 15 मार्च रोजी दररोज दुपारी एक वाजता तज्ज्ञांंचे मार्गदर्शन व शेतकरी बांधवांचा सन्मान केला जाणार आहे.

चारशे स्टॉलची उभारणी

कृषिकुंभमध्ये चारशेपेक्षा अधिक स्टॉल्स उभारले जाणार आहेत. यात बियाणे, खते, कीटकनाशके, यांत्रिकीकरण या विषयांसह शेतीतील जुगाड ते तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया विशेष दालन, नैसर्गिक शेती व बायोचार, हायड्रोपोनिक्स व मत्स्यपालन, सोलर ड्रायर, पाणलोटाचे प्रत्यक्ष मॉडेल, जलताराचे प्रत्यक्ष मॉडेल, मधमाशीपालन मॉडेल, ग्रेप कव्हर, फ्रुट कव्हर मॉडेल, आधुनिक कांदाचाळ, मशरूम, रेशीम, मोबाईल माती परीक्षण, हवामान केंद्रे, मुरघास, हनी पार्क आदींचा समावेश असणार आहे.

शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी

शेतकर्‍यांना शासकीय योजनांसाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी प्रदर्शनात थेट अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी पतपुरवठा, यांत्रिकीकरण व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत बँकांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतील.

Krishi Kumbh to be held in Nashik from March 12 to 16

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago