उत्तर महाराष्ट्र

कुळवंडी बंधार्‍याने 10 गावांचा दुष्काळ संपणार

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक : पेठ तालुक्यातील कुळवंडी येथे बंधारा बांधण्यासाठी तब्बल 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या धरणाचा दहा गावांना फायदा होणार असून, तालुक्याची सिंचन क्षमता 230 हेक्टरने वाढणार आहे. या प्रकल्पामुळे कुळवंडी शिवारातील गावांचा 20 वर्षांपासूनचा दुष्काळ संपणार असल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला.

बंधार्‍याच्या कामाचे भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपविभागीय जलसंधारण अधिकारी नारायाण डावरे, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळसे, सचिन खंबाईत यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी झिरवाळ म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला हरिभाऊ गिते यांची मदत होणार आहे. त्यांना कामाची पध्दत माहिती असल्याने  प्रत्येक टेबलविषयी त्यांना इंथभूत माहिती आहे. त्यामुळे तत्वाला काम मार्गी लागते. त्यांच्याकडे एक काम दिले होते. त्यांनी आठ दिवसांत ते काम मार्गी लावले. त्यांच्यासारखा अधिकारी जिल्ह्याला लाभल्याने जिल्ह्याचा विकास निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुळवंडीचा या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यासह कृषी सिंचनासअठी जवळपास 69.26 दशलक्ष घनफूट क्षमता असलेला प्रकल्प मंजूर झाला आहे. यामुळे कुळवंडीसह घनशेतपाडा, हट्टीपाडा, नाईकपाडा, निमोणीपाडा, कडवईपाडा, बर्डापादा व गावंद येथील गावांना पाणी मिळेल. या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी झाले. आमदार नरहरी झिरवाळ हेच मतदारसंघाचे पाणदेव असल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, नगराध्यक्ष करण करवंदे, मनोहर चौधरी, गोकुळ झिरवाळ, गिरीश गावित, रामदास गवळी, हिरामण पवार, मोहन गावंडे, हनुमंत गवळी, गणेश गवळी आदी उपस्थित होते.

 

प्रकल्पाची वैशिष्ठ्ये

पाणलोट क्षेत्र : 4.95 चौरस किलो मिटर

साठवण क्षमता : 69.26 दशलक्ष घनफूट

सिंचन क्षमता : 230 हेक्टर

धरणाची उंची : 29.24 मीटर

धरणाची लांबी : 375 मीटर

सांडव्याची रुंदी : 56 मीटर

कालवा लांबी : 2 किलो मिटर

Bhagwat Udavant

Recent Posts

सावकार वैभव देवरेच्या  जाचाला कंटाळून ‘ डीएसपी बासुंदी चहा’ फेम व्यावसायिकाची आत्महत्या

सावकार वैभव देवरेच्या  जाचाला कंटाळून डीएसपी बासुंदी चहा' फेम व्यावसायिकाची आत्महत्या सिडको विशेष प्रतिनिधी सावकारीच्या…

2 days ago

चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे

चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे नाशिक/ काजी सांगवी…

2 days ago

एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा

एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा भात शेतीचे  नुकसान, शेतकरी चिंतेत धामणगांव :   सुनील गाढवे पावसाचे माहेरघर…

3 days ago

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या.

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या इंदिरानगर :  प्रतिनिधी इंदिरानगरमधील साईनाथ नगर चौफुली जवळ…

3 days ago

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच खासदार अखिलेश यादव: मालेगावात समाजवादीची सभा मनमाड :…

4 days ago

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ आ. फरांदे यांचे निवडणूक अधिकार्‍यांना निवेदन नाशिक  ः प्रतिनिधी…

4 days ago